Pensioners DR Hike: सेवानिवृत्तधारकांना खूशखबर! बँक खात्यात जमा होणार मोठी रक्कम, सरकारकडून मिळाली मंजुरी

नवे वर्ष 2022 हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. अशातच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी खूशखबर आहे. त्याच्या बँक खात्यात लवकरच मोठी रक्कम जमा होणार आहे.

Published: January 14, 2022 7:54 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Pensioners DR Hike: सेवानिवृत्तधारकांना खूशखबर! बँक खात्यात जमा होणार मोठी रक्कम, सरकारकडून मिळाली मंजुरी

Pensioners DR Hike: नवे वर्ष 2022 (New Year 2022) हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. अशातच सेवानिवृत्त (Pensioners) कर्मचाऱ्यासाठी खूशखबर आहे. त्याच्या बँक खात्यात लवकरच मोठी रक्कम जमा होणार आहे. सरकारने (Central Government) वाढीव महागाई भत्ता (Dearness Relief) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

Also Read:

सरकारने बँकांकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतनाबाबत माहिती मागवली आहे. त्या हिशेबाने त्यांच्या वाढीव महागाई भत्त्याची रक्कम (Dearness Relief) बँक खात्यावर जमा केली जाईल. विशेष म्हणजे बँकांनी संबंधित विभागाच्या आदेशाची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही, असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश कुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांनी केंद्रीय नागरी निवृत्तीवेतनधारक, स्वातंत्र्य सैनिक (SSS Yojana), सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, संसद सदस्य आणि इतर निवृत्तीवेतनधारकांना लवकरात लवकर निधी जारी करावा. यामध्ये त्यांच्या विभागाकडून वाढवून दिलेल्या महागाई भत्त्यांचा समावेश असेल. विभागाने यापूर्वीच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पेन्शन विथड्रॉल बँकेला ऑर्डर प्राप्त झाली नसेल, तर संबंधीत पोर्टलवर माहिती मिळवू शकते.

या विभागांना दिले आदेश…

– पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग (DOPPW)
– स्वातंत्र्य सैनिक आणि पुनर्वसन (FFR) विभाग, गृह मंत्रालय
– न्याय विभाग
– नागरी उड्डयन आणि पर्यटन मंत्रालय
– सार्वजनिक उपक्रम विभाग

दरम्यान, सरकारने याआधीच स्वातंत्रसैनिकांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता सुधारित दरानुसार 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आला आहे. उदा. त्यांची पेन्शन 3000 रुपयांवरून 9000 रुपये करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने 28 जुलै 2021 रोजी याबाबत निर्देश दिले होते.

आता किती मिळेल पेंशन?

– अंदमानचे माजी राजकीय कैदी/पत्नी यांची पेन्शन प्रतिमहा 30000 रुपयांवरून 38800 रुपये मिळेल.
– स्वातंत्र्यसैनिक ज्यांना भारताबाहेर त्रास सहन करावा लागला. त्यांची पेन्शन 28000 रुपयांवरून 36120 रुपये प्रति महिना मिळेल.
– INA सह इतर स्वातंत्र्यसैनिकांना 26000 वरून 33540 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल.
– आश्रित पालक/पात्र मुलीला मिळणारी पेन्शन आता 15000 रुपयांवरून 19350 रुपये प्रतिमहा होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 14, 2022 7:54 PM IST