नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच आहे. आधीच महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलं आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे (Fuel Price Hike In India) सर्वसामान्य जनता आणखी त्रस्त झाली आहे. इंधन कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike again) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. आतापर्यंतच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. पण शनिवारी पुन्हा दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात (Petrol Price) 35 पैसे प्रती लीटरने वाढ झाली आहेत. तर डिझेलच्या दरात (Disel Price) 35 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.Also Read - Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ नाही

आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Marcket) कच्च्या तेलांच्या (Crude oil) किमतीत घट होत असताना सुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनता संतप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती बदलल्या की देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील बदलतात. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आता पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. 9 राज्यांमध्ये पट्रोलच्या दराने शंभरचा आकडा पार केला आहे. Also Read - Aadhaar-PAN Link : आधार-पॅन लिंक केले नसेल तर लवकर करा, 30 जूननंतर द्यावे लागतील 1000 रुपये!

गेल्या महिनाभरात देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लदाखमध्ये पट्रोलच्या दरांनी शंभरीपार केली आहे. याव्यतिरिक्त मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये देखील पेट्रोल प्रति लिटर 100 रुपये झाले आहे. Also Read - Sarkari Naukari: मोदी सरकार 10 लाख तरुणांना देणार नोकऱ्या, पंतप्रधानांच्या सर्व विभागांना भरतीसंदर्भात सूचना

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…

मुंबई –
पेट्रोल – 104.22 रुपये प्रति लिटर
डिझेल – 96.16 रुपये प्रति लिटर

दिल्ली –
पेट्रोल – 98.11 रुपये प्रति लिटर
डिझेल – 88.65 रुपये प्रति लिटर

चेन्नई –
पेट्रोल – 99.18 रुपये प्रति लिटर
डिझेल – 93.22 रुपये प्रति लिटर

कोलकाता –
पेट्रोल – 97.99 रुपये प्रति लिटर
डिझेल – 91.49 रुपये प्रति लिटर