मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका सुरूच आहे. (Petrol Diesel Price Hike in India) परिणामी वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यात मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागलं आहे. जून महिन्यातील ही 16 वी इंधन दरवाढ वाढ आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये (Shriganganagar) पेट्रोलच्या दरानं 110 रुपयांचा आकडा गाठला आहे. आता तर मुंबईनंतर (Mumbai) चेन्नई (Chennai) शहरात देखील पेट्रोलनं शंभरी पार केली आहे.Also Read - Cement Price Hike: महागाईचा स्फोट! सिमेंटचे दर वाढले, एका पोत्यामागे 55 रुपयांनी वाढ!

देशात राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच 110 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरमध्ये डिझेलचा दर देखील अधिक आहे. डिझेलचा दर प्रतिलिटर दर 102 रुपये आहे. देशातील 332 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी स्थिर असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या दरांत मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दरम्यान, देशभरात 4 मेनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. Also Read - Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूरात पेट्रोल फक्त 1 रुपयात मिळणार!

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. Also Read - Petrol-Diesel दरवाढीमुळे Electric Vehicles खरेदीकडे कल वाढला, विक्रीमध्ये 218 टक्क्यांनी झाली वाढ!

जाणून घ्या 4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर

दिल्ली-  98.81
मुंबई-  104.90
कोलकाता-  98.64
चेन्नई-  99.80

डिझेलचे दर…
दिल्ली- 88.18
मुंबई-  96.72
कोलकाता-  92.03
चेन्नई- 93.72