By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, जाणून घ्या नवे इंधन दर
Petrol Diesel Price Hike 27 March: वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंपरडे मोडलेले असताना आता पुन्हा एकदा नागरिकांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price Hike 27 March: वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंपरडे मोडलेले असताना आता पुन्हा एकदा नागरिकांना इंधन दरवाढीचा (Fuel price today) सामना करावा लागणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या (Petrol Price today) दरात 50 पैशांनी तर डिझेलच्या दरात 55 पैशांनी वाढ (Diesel Price today) झाली आहे. आज (रविवारी) सकाळी 6 वाजल्यापासून हे वाढलेले दर (Fuel price hike) लागू होतील. 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) सुमारे 3.70 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानंतर आता 27 मार्चच्या सकाळपासून नवे दर लागू होणार आहेत.
Also Read:
- Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ नाही
- Cement Price Hike: महागाईचा स्फोट! सिमेंटचे दर वाढले, एका पोत्यामागे 55 रुपयांनी वाढ!
- Petrol Diesel Price : क्रूड ऑईल महागल्याने देशात पेट्रोल-डिझेल पुन्हा भडकणार, जाणून घ्या आजचे दर
आज सकाळपासून 6 वाजता दिल्लीत पेट्रोल 99.11 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.42 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या 6 दिवसात 3.70 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 मार्च आणि 23 मार्च रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 80-80 पैशांनी वाढ केली होती. त्यानंतर 24 मार्च हा दिलासा देणारा दिवस ठरला. कारण या दिवशी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढवल्या नाहीत. मात्र त्यानंतर 25 आणि 26 मार्चला पुन्हा इंधन दरात वाढ करण्यात आली. आता 27 मार्चपासून आणखी नवे वाढलेले दर लागू होणार आहेत.
सरकारी तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करू शकतात. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तेल कंपन्यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान 137 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र निवडणुका संपल्यानंतर त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.