By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरुच, आज पेट्रोल आणि डिझेल 80 पैशांनी महागले!
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सततच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आणखी फटका बसणार आहे.

Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे (Petrol Diesel Price Hike) सत्र पुन्हा सुरु झाले आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) वाढले आहेत. मागच्या पाच दिवसातील ही चौथी दरवाढ आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum companies) आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू केले आहेत. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सततच्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आणखी फटका बसणार आहे.
नवीन दरवाढीनुसार, मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Mumbai Petrol Price) 113.29 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत (Mumbai Diesel Price) 97.49 रुपये झाली आहे. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर (Delhi Petrol Price) 98.61 रुपये आणि डिझेलचा दर (Delhi Diesel Price) 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग अनेक दिवस वाढ होऊ शकते. जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या 137 दिवसांपासून स्थिर होते. पण 22 आणि 23 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. त्यानंतर 24 तारखेच्या विश्रांतनंतर 25 मार्चला पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 22 आणि 23 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. 25 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 82-81 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे.
Trending Now
प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –
मुंबई –
पेट्रोल – 113.31 रुपये प्रति लिटर
डिझेल – 97.50 रुपये प्रति लिटर
दिल्ली –
पेट्रोल – 98.61 रुपये प्रति लिटर
डिझेल – 89.87 रुपये प्रति लिटर
चेन्नई –
पेट्रोल – 1034.47 रुपये प्रति लिटर
डिझेल – 94.51 रुपये प्रति लिटर
कोलकाता –
पेट्रोल – 107.98 रुपये प्रति लिटर
डिझेल – 93.02 रुपये प्रति लिटर
बंगळुरू –
पेट्रोल – 103.91 रुपये प्रति लिटर
डिझेल – 88.17 रुपये प्रति लिटर
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या