
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Petrol Diesel Price Today 29 March 2022: देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे (Petrol Diesel Rate) सत्र सुरुच आहे. आज पुन्हा पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रतिलिटर तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. देशात दररोज इंधन दरवाढीचा भडका उडत असल्याने जनता महागाईच्या (Fuel Price Hike) चक्रव्यूहात आणखी अडकत चालली आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी 29 मार्च रोजी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. गेल्या 8 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 7 व्यांदा वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi Petrol Diesel Rate Today) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज क्रमश: 80 आणि 70 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोलचा दर 100.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.47 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 109.68 रुपये (83 पैशांनी वाढ) आणि डिझेल 94.62 रुपये (70 पैशांनी वाढ) प्रतिलिटर प्रमाणे विकले जात आहे.
दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Mumbai Petrol Diesel Rate Today) क्रमशः 85 पैसे आणि 75 पैशांनी वाढ झाली आहे. वाढीव दरानुसार मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 115.04 रुपये आणि डिझेल 99.25 रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. चेन्नईत (Chennai Petrol Diesel Rate Today)पेट्रोलच्या दरात 76 पैशाने वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.94 रुपये झाला आहे. तर डिझेलच्या दरात 67 पैशाने वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर प्रतिलिटर 96 रुपये झाला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) दरात तब्बल 137 दिवसांनी म्हणजेच 22 मार्च रोजी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांत सातव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होईल, असे संकेत आधीच मिळाले होते.
लोकसभेत देखील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा चांगला गाजत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावरून विरोधी पक्षाने सोमवारी सरकारला घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र कधी थांबणार? असा सवाल TMCKS सुदीप बंदोपाध्याय यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेत अधीर रंजन चौधरी यांनी महागाईमुळे देशातील जनता बेहाल झाली असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संपूर्ण देशात “महंगाई मुक्त भारत अभियान” चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या