Top Recommended Stories

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) बुधवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत. देशात सलग 76 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Updated: January 19, 2022 11:09 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Petrol-Diesel Price Hike
Petrol-Diesel Price Hike

Crude Oil Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil Prices) 7 वर्षात आसमानाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमीरातमध्ये विद्रोहीनी केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी जगभरात इंधनाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत (Assembly Election In India) आहेत. उत्तरप्रदेश (UP Assembly Election), पंचाब (Punjab Assembly Election), उत्तराखंड (Uttarakhand Assembly Election), मनिपूर (Manipur Assembly Election) आणि गोवा (Goa Assembly Election) या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामुळे सरकारने इंधनाचे दर नियंत्रणात ठेवले आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today)कोणताही बदल केलेला नाही. गेल्या 76 दिवसांपासून देशासह राज्यातही (Maharashtra Petrol-Diesel Price Today) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. बुधवारीही दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे.

Also Read:

भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) बुधवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत. देशात सलग 76 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने दिवाळीच्या एक दिवसआधी पूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

You may like to read

जाणून तर मग.. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…

मुंबई- 109.98 रुपये (पेट्रोल)- 94.14 रुपये (डिझेल)
ठाणे- 110.12 रुपये (पेट्रोल)-94.28 रुपये (डिझेल)
पुणे- 109.72 रुपये (पेट्रोल)-92.50 रुपये (डिझेल)
नाशिक- 109.79 रुपये (पेट्रोल)- 92.57 रुपये (डिझेल)
नागपूर- 110.10 रुपये (पेट्रोल)-92.90 रुपये(डिझेल)
कोल्हापूर- 109.66 रुपये (पेट्रोल)- 92.48 रुपये (डिझेल)
अहमदनगर- 110.12 रुपये (पेट्रोल)- 92.90 रुपये (डिझेल)
अमरावती- 111.14 रुपये प्रति लिटर- 93.90 रुपये (डिझेल)

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –

दिल्ली – पेट्रोल –95.41 रुपये, डिझेल –86.67 रुपये
चेन्नई –पेट्रोल –101.40 रुपये, डिझेल –91.43 रुपये
कोलकाता –पेट्रोल –104.67 रुपये, डिझेल –89.79 रुपये
पाटणा – पेट्रोल –105.92 रुपये, डिझेल –91.09 रुपये

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर (check diesel petrol price daily) देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि 9223112222 या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 19, 2022 11:08 AM IST

Updated Date: January 19, 2022 11:09 AM IST