मुंबई: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहले होते. पण आज पुन्हा एकदा दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. आज पेट्रोलच्या किमतीत (Petrol price today) 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किमतीत देखील (Diesel price today) 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil Rate) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण उत्पादन कमी असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशात पेट्रोल शंभरी पार झाले आहे त्यापाठोपाठ आता डिझेल देखील शंभरी पार होताना दिसत आहे.Also Read - Petrol-Diesel Price: दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा इंधनाचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ!

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत. इंधन दर वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Petrol-diesel Price) एक लिटर पेट्रोल 104.79 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलचे 93.54 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर मुंबईमध्ये (Mumbai Petrol-diesel Price) एक लिटर पेट्रोल 110.75 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 101.40 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. नवरात्रोत्सव सुरु आहे अशात दिवाळी देखील तोंडावर आली आहे. अशामध्ये सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. Also Read - Petrol-Diesel Price: दसऱ्याची दिवशी सुद्धा इंधनाचा भडका सुरुच, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ!

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत फक्त 4 ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 82 डॉलर्स प्रति बॅलरच्या पुढे गेली आहे. तर एका महिन्यापूर्वी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 72 डॉलर्स प्रति बॅलर होती. दरम्यान, देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 3.59 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल 4.92 रुपयांनी महागले आहे. Also Read - Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका सुरुच! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर!

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…

मुंबई –
पेट्रोल – 110.75 रुपये प्रति लिटर
डिझेल – 101.40 रुपये प्रति लिटर

दिल्ली –
पेट्रोल – 104.79 रुपये प्रति लिटर
डिझेल – 93.54 रुपये प्रति लिटर

कोलकाता –
पेट्रोल – 105.43 रुपये प्रति लिटर
डिझेल – 96.63 रुपये प्रति लिटर

चेन्नई –
पेट्रोल – 102.10 रुपये प्रति लिटर
डिझेल – 97.93 रुपये प्रति लिटर