मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना केंद्र सरकारनं खूशखबर दिली आहे. पीफवरील (PF)व्याजाची रक्कम (Interest on PF) दिवाळी आधी खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ( Diwali) गोड होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 6 कोटींहून अधिक सदस्यांना मिळणार आहे.Also Read - India vs Pakistan: पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर, VIDEO होतोय VIRAL

मिळालेली माहिती अशी की, सन 2020-21 वर्षाचं 8.5 टक्के व्याजाची रक्कम EPFO च्या 6 कोटी सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे. EPFO च्या प्रस्तावाला सरकारनं ग्रीन सिग्नल दाखवला आहे. कामगार मंत्रालयानं या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच घोषणा करू शकते. ही रक्कम दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. Also Read - Breaking News Live Updates: क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडेची आज पुन्हा चौकशी होणार

EPFO नं 2020-21 या आर्थिक वर्षासाठी केवळ 8.5 टक्के व्याजदर चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षात देखील व्याज समान होते. त्याचबरोबर, 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज EPFO वर उपलब्ध होते. सन 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आले होते. वास्तविक, 2019-20 या आर्थिक वर्षात, केवायसीमधील अडथळ्यामुळे अनेकांना 8-10 महिन्यांनंतर व्याज मिळालं होतं. Also Read - Digital Fraud: तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, श्रद्धेच्या नावाखाली घातला जातोय डिजिटल गंडा

EPFO नं ट्विटरद्वारे जारी केला अलर्ट…

दरम्यान, अलिकडे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर EPFO नं आपल्या सदस्यांसाठी ट्वीट करत अलर्ट जारी केला आहे. बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओनं आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केलं आहे.
‘ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही. ईपीएफओ त्याच्या खातेधारकाला कोणताही फोन कॉल करत नाही.’, असं ईपीएफओनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.