PF New Rules: नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून PF खात्यावर टॅक्स लागणार
PF New Rules: देशातील नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (Employees Provident Fund Organization) सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

PF New Rules: देशातील नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (Employees Provident Fund Organization) सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने आता प्रॉव्हिडंट फंडवर (Employees Provident Fund) कर (Tax) आकारणी सुरुवात करणार आहे. येत्या एक एप्रिलपासून PF खात्यावर कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी घोषणा केली आहे.
Also Read:
अर्थमंत्र्यांनी सांगितले, नवीन आयकर नियमाबाबत (PF New Rules) सरकारने गेल्या वर्षीच अधिसूचित केले होते. त्यानुसार आता PF खाते दोन भागात विभागले जाणार आहेत. PF खात्यात वर्षाला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त अधिक रक्कम अर्थात एंप्लॉयी कॉन्ट्रिब्यूशनवर (Employee Contributions) कर आकारण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून नवा नियम लागू करण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न असलेल्या नोकरदार वर्गाला सरकारी कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यापासून रोखणे, या यामागील उद्देश असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु सरकारी कर्मचारी आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील त्यांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर सूट मिळणार असल्याचीही माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यावर जमा होतो. पण आता पीएफच्या नियमांमध्ये काही नवे बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून सध्याची पीएफ खाते दोन भागात विभागले जाण्याची शक्यता आहे.
या करदात्यांची फटका बसणार नाही…
येत्या 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहे. बहुतेक पीएफ सदस्यांना अडीच लाख रुपयांच्या मर्यादेचा फायदा होईल. प्रामुख्याने उच्च उत्पन्न असलेल्या नोकरदार वर्गावर याचा परिणाम होईल. तुमचा पगार कमी असेल आणि तुमच्या PF खात्यात अडीच लाखांहून अधिक तुम्हाला या नवीन नियमात काहीही फरक पडणार नाही.
काय आहेत PF चे नवे नियम…
– तुमच्या PF खात्यावर वर्षाला अडीच लाखांहून जास्त एंप्लॉयी कॉन्ट्रिब्यूशन जमा होत असेल आणि त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागेल. प्राप्तीकर (आयटी) नियमांतर्गत नवीन कलम 9D समाविष्ट करण्यात आले आहे.
– पीएफ खाते करपात्र आणि करपात्र नसलेल्या कॉन्ट्रिब्युशन दोन खात्यामध्ये विभागले जाईल.
– करपात्र नसलेल्या खात्यामध्ये त्यांचे क्लोजिंग अकाऊंट देखील समाविष्ट असेल.
– नवीन पीएफ नियम पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2022 पासून लागू केले जाऊ शकतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या