नवी दिल्ली : ईपीएफ (EPF) भरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक उपयुक्त माहिती समोर आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तुमच्यावर रुग्णालयाच्या खर्चाचा भार पडला तर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम काढता येणार आहे. ईपीएफसाठी (EPFO) नोंदणीकृत असलेल्या कर्मचार्‍यांना आपल्या पीएफ खात्यातून मेडिकल इमरजन्सीच्या परिस्थितीत 1 लाख रुपयांपर्यंत अडव्हान्स रक्कम काढता येऊ शकते. ही रक्कम आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास काढली जाऊ शकते. आपल्या जमा झालेल्या पीएफ निधीतून ही रक्कम घेता येऊ शकते. इमरजन्सी अडव्हान्स काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबतच्या कोणत्याही अंदाजे रक्कमेविषयी माहिती देण्याची आवश्यकता नाही.Also Read - EPFO Balance Cheak: तुमच्या खात्यात किती PF जमा झालाय? SMS आणि मिस कॉल करून मिळवा माहिती

कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेद्वारे (Employees’ Provident Fund Organisation) जारी केलेल्या सर्क्युलरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. पीएफ योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांच्या आपत्कालीन उपचार परिस्थितीच्या बाबतीत प्रथम उपचार प्रदान करण्याच्या संबधीत EPFO कडून परिपत्रकात संशोधन करण्यात आले होते. Also Read - EPFO: हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होताच मिळेल 1 लाख अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना

सुधारित आणि सुव्यवस्थित परिपत्रकामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आगाऊ रक्कम आणि त्यासाठी असणाऱ्या उपचारांच्या अटी देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. परिपत्रकानुसार ही सुविधा केन्द्रीय सेवा वैद्यकीय परिचारक (सीएस (एमए)) च्या नियमांतर्गत येणाऱ्या कर्मचार्‍यांना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांना लागू आहे. Also Read - EPFO NEWS: कोट्यावधी सदस्यांना दिलासा, कोरोना संकट काळात दिली 'ही' सुविधा

अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत जीवघेण्या आजारांमुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते आणि अशा परिस्थितीत रुग्णालयातील खर्चाचा अंदाज घेणे शक्य नसते. काही परिस्थितीत रुग्ण आयसीयूमध्ये असू शकतो जिथे त्याचे रोगनिदान आधीपासूनच माहित नसते. त्यामुळे कोविडसह जीवघेण्या गंभीर आजारामुळे आपत्कालीन परिस्थितीत रूग्णालयात भरती होण्यासाठी आगाऊ रक्कम काढण्याच्या मंजुरीसाठी ही प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते असे परिपत्रकात नमूद केले आहे.

EPFO च्या पैसे काढण्याच्या अटी काय आहेत?

जे रक्कम काढली जाऊ शकते ती कमीतकमी 6 महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा सदस्यांच्या हिस्स्याच्या व्याजासह असेल.