मुंबई : अनेक लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटोज घरात लावतात. घराच्या भिंतींवर फोटो लावणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत माणली जाते. तसेच आठवणी जपण्यासाठी देखील घरात फॅमिली फोटोज लावले जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की घरात फोटो लावताना लोक काही चुका करतात. त्यामुळे त्याचा वास्तुनुसार वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला वास्तुनुसार घरात कुठे फोटो लावावेत (Photos Vastu Tips) याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात फोटो लावण्याची योग्य पद्धत…Also Read - Vastu Tips : हळदीचा 'हा' एक उपाय दूर करेल वास्तुदोष, जाणून घ्या अशाच काही विशेष उपायांबाबत माहिती

कोणते फोटो कुठे लावावेत

  • घरात फॅमिली फोटोज (family photos) लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा म्हणजे दक्षिण-पश्चिम भिंत. या दिशेला कौटुंबिक फोटो लावल्याने आपसात प्रेम वाढते आणि संबंधही चांगले होतात.
  • तुमच्या फोटोंमध्ये किंवा पेंटिंगमध्ये वॉटर बॉडीज (Water bodies) असतील तर असे फोटो उत्तर दिशेला लावले पाहिजे. तसेच ज्या पेंटिंग्जमध्ये अग्नी दाखवण्यात आला आहे, असे फोटो घरात दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर लावले पाहिजे.
  • बहुतेक लोकांच्या घरात आठवणींच्या स्वरुपात पूर्वजांचे फोटो (Photos of ancestors) असतात. मात्र पूर्वजांचे फोटो कधीही मंदिरात ठेवू नये. घरात पूर्वजांचे फोटो लावायचे असतील तर ते फक्त दक्षिणेकडील भिंतीवरच लावले पाहिजे.
  • घरातील जोडप्याच्या बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे फोटो (Photo of Radha-Krishna) लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने दोघांमधील परस्पर समंजसपणा वाढतो आणि नात्यात गोडवा येतो. असे फोटो बेडरूमच्या दक्षिण-पश्चिम भिंतीवर लावले पाहिजे.

हे फोटोज वा पेंटिग्ज घरात लावू नये

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घनदाट जंगल, हिंस्र प्राणी, लाल रंगाचे फोटोज किंवा पेंटिंग्ज लावू नयेत. तसेच ऐतिहासिक किंवा युद्धप्रसंग असलेले फोटोज आणि पेंटिग्ज घरात लावू नयेत. यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. किंवा नातेसंबंधात कटुता निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात. असे फोटो घरात लावल्यास नकारात्मता वाढण्याची शक्यता असते. (photos vastu tips family photos should be placed in this direction of the house put such pictures in the bedroom) Also Read - Vastu Tips : सूर्यास्ताच्या वेळी या गोष्टी करणं मानलं जातं अशुभ, नाराज होते माता लक्ष्मी!

Also Read - Astrology Benefits of Salt : चिमूटभर मीठ तुमचं नशीब बदलू शकते, तुम्ही व्हाल धनवान