नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या ‘पीएम आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) तुम्हाला घर मिळालं आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारनं ‘पीएम आवास योजनेच्या (PM Awas Yojana) नियमांत मोठा बदल केला आहे.Also Read - India vs Pakistan: पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर, VIDEO होतोय VIRAL

पीएम आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं असेल तर त्या घरात पाच वर्षे राहणं बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमाचं तुम्ही पालन केलं नाही, तर तुम्हाला मिळालेलं घर रद्द होऊ शकतं. सध्या ज्या घरांना रजिस्टर्ड अ‍ॅग्रिमेंट टू लीज करून दिले जात आहे किंवा जे लोक हा अ‍ॅग्रिमेंट भविष्यात करतील, ते रजिस्ट्रीमध्ये नाही. Also Read - Digital Fraud: तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, श्रद्धेच्या नावाखाली घातला जातोय डिजिटल गंडा

पीएम आवास योजनेत मिळालेली घरं लाभार्थी वापरत नाहीत. भाडेतत्वावर देतात ही बाब सरकारच्या लक्षात आली आहे. एकंदरीत या योजनेत मोठी हेराफेरी सुरू असल्याचं देखील निदर्शनात आलं आहे. आता यावर अंकूश ठेवण्यासाठी योजनेत मिळालेलं घर लाभार्थी वापरत आहेत की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. तुम्ही संबंधित घरांत राह राहत असाल तरच या अ‍ॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला अ‍ॅग्रिमेंटही संपुष्टात आणेल. त्याचबरोबर तुम्ही जमा केलेली रक्कम देखील परत केली जाणार नाही, असं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. Also Read - Raj Thackeray Covid Positive: राज ठाकरेंनी आता तरी मास्क परिधान करावा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील कानपूर शहरा पीएम आवास योजनेत मिळालेल्या घरात लोकांना राहाण्याचे अधिकार दिले जात आहे. त्याचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रिमेंट टू लीज करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात केडीएचे उपाध्यक्ष अरविंद सिंह यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 60 जणांसोबत अ‍ॅग्रिमेंटला ला लीज डीडमध्ये बदलण्यात आलं आहे. या धर्तीवर 10900 पेक्षा जास्त योजनेतील घरांचे अ‍ॅग्रिमेंट करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी नवा नियम लागू असेल असं अरविंद सिंह यांनी सांगितलं आहे.

काय आहेत नव्या अटी आणि शर्ती?

– पीएम आवास योजनेअंतर्गत शहरी भागात बांधलेले फ्लॅट कधीही फ्री होल्ड होणार नाहीत.
– पाच वर्षांनंतरही लोकांना लीजवर राहावे लागेल.
– पीएम आवास योजनेअंतर्गत जे घर भाड्यानं घेत होते, ते आता बंद होईल.
– पीएम आवास योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर नियमानुसार, केवळ कुटुंबातील सदस्याला लीज हस्तांतरित केले जाईल.
– इतर कोणत्याही कुटुंबासोबत केडीए कोणतेही अ‍ॅग्रिमेंट करणार नाही.
– या अ‍ॅग्रिमेंटअंतर्गत लाभार्थ्यांना 5 वर्षे घरांचा वापर करणे बंधनकारक आहे. यानंतर घरांचे लीज दिले जाईल.