Top Recommended Stories

PM Kisan 11th Installment: दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम पोहोचली, असे चेक करा बॅलेन्स

PM Kisan 11th Installment: पंतप्रधान मोदींनी आज शिमला येथून पीएम किसान सन्मान (PM Kisan Samman Yojana) योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या (PM Kisan Beneficiaries) खात्यात 2,000 रुपये हस्तांतरित केले आहे.

Published: May 31, 2022 2:37 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

PM Kisan 11th Installment: दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम पोहोचली, असे चेक करा बॅलेन्स
PM Kisan 11th Installment

PM Kisan Samman Yojana 11th Installment: पंतप्रधान मोदींनी आज शिमला येथून पीएम किसान सन्मान (PM Kisan Samman Yojana) योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या (PM Kisan Beneficiaries) खात्यात 2,000 रुपये हस्तांतरित (PM Kisan 11th Installment) केले आहे. केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्राच्या आठ मंत्रालयांच्या 16 योजनांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांशी आभासी संवाद देखील साधला.

शेतकऱ्यांना यो योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे 11वा हप्ता ( PM Kisan 11th Installment) खात्यात जमा होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे.

You may like to read

किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्त्याच्या रुपात 101230858 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून एकूण 210984502000 रुपये थेट जमा करण्यात आले. तुम्हीही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर लगेच तुमचे नाव आणि खाते तपासा. येथे जाणून काय आहे संपूर्ण प्रक्रिया.

यादीत असे तपासा तुमचे नाव

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
आता होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List पर्यायावर क्लिक करा.
आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा.
यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, त्यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>