नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. लवकरच त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) 9 वा हप्ता जमा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा करणार आहे. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.Also Read - PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते दुप्पट रक्कम

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. येत्या 9 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत 9 वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवतील, अशी माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी pmindiawebcast.nic.in नोंदणी करण्याचं आवाहन नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. Also Read - Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे? कोणते कागदपत्र आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. Also Read - PM Kisan Samman Yojana: 9व्या हप्त्याची वाट पाहत आहात? मग नक्की जाणून घ्या बदलेले हे 5 नियम

यादीत असं चेक करा आपलं नाव-

1. आधी पीएम किसान (PM Kisan) च्या अधिकृत वेबसाइटवर https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
2. उजव्या बाजुला ‘Farmers Corner’चा ऑप्शन दिसेल.
3.‘Beneficiary List’च्या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर नवीन पेज उघडेल.
4. नव्या पेजवर विचारलेली माहिती द्या. (उदा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव)
5. त्यानंतर Get Report वर क्लिक करा. स्क्रिनवर तुम्हाला लाभार्थींची संपूर्ण यादी दिसेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती.