नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) नववा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या 9 ऑगस्टला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा नववा हप्ता वर्ग केल्याचं जाहीर केलं. नवव्या हप्त्याचा लाभ 9.75 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना मिळणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं (PMO) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. अशातच देशातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.Also Read - Gujarat New CM Bhupendra Patel: जनमाणसात ‘दादा’ नावानं प्रचलित, कोण आहेत गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री

मोदी सरकार (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 असे वार्षिक 6000 रुपये दिले जातात. आता या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. वार्षिक 6000 ऐवजी शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतील. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 हजाराच्या ऐवजी 4000 रुपये मिळतील, अशी जोरदार चर्चा आहे. Also Read - 'Into The Wild with Bear Grylls' या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत स्टंट करताना दिसणार अजय देवगण!

बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह (Amrendra Pratap Singh) यांनी याबाबत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agricutur Minister Narendra Singh Tomar) आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण ( Union Finace Minister Nirmala Sitaraman) यांच्याशी चर्चा केली. कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेली माहिती अशी की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम आता दुप्पट होऊ शकते. केंद्र सरकारनं यासंदर्भात पूर्ण तयारी केली आहे. मात्र, कृषीमंत्र्यांनी याबाबत दावा केला असला तरी केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Also Read - Ganesh Chaturthi 2021: पीएम मोदींनी मराठीत ट्वीट करत दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, म्हणाले...

दरम्यान, केंद्र सरकारनं गेल्या सोमवारी (9 ऑगस्ट) देशभरातील 9.75 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 19500 कोटी रुपये ट्रान्सफर केले. या निधी योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, असं check करा…

-तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हे तपासण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
-वेबसाइटवर उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर एक पेज ओपन होईल. तेथे ‘बेनेफिशियरी स्टेटस’ असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
– या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.
– येथे तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.
– तुम्ही तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुमचे स्टेटस दाखवले जाईल आणि तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे ही कळेल.