PM Kisan Samman Yojana : पीएम किसान योजनेच्या यादीत असं जोडा तुमचं नाव, जाणून घ्या प्रक्रिया
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी पीएम किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता जारी केला. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले.

PM Kisan Samman Yojana: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) पीएम किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Samman Yojana) 10 वा हप्ता जारी केला. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Yojana) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत शेतकरी आपलं नाव तपासू शकतात.
Also Read:
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुरू केली योजना
पीएम किसान योजना किंवा पीएम किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. यापूर्वी ही योजना 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लोकांसाठी मर्यादित होती. मात्र नंतर ही योजना सर्व अल्पभूधारक कुटूंबांसाठी विस्तारित करण्यात आली.
1 जानेवारी 2022 रोजी 351 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPO) 14 कोटी रुपयांचे अनुदान जारी करण्यात आले. याचा फायदा 1.24 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. पीएम किसानची स्थिती त्याच्या अधिकृत पोर्टल www.pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते.
पीएम किसान लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे जोडायचे?
- पात्र शेतकरी पीएम किसान योजनेंतर्गत त्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी खालील टप्प्यांचे अनुसरण करू शकतात.
- सर्वात आधी www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- आता होम पेजवर तुम्हाला ‘Farmers Corner’ पर्या दिसेल. त्यावर क्लिक करा.
- पुढे, ‘New Farmer Registration’ वर क्लिक करा.
- आता तुमच्यासाठी नोंदणी फॉर्म उघडेल.
- सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी सेव्ह करा.
अर्जासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे
- जमिनीची मूळ कागदपत्रे
- अर्जदाराचे बँक पासबुक
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणपत्र
- तुमच्या मालकीच्या जमिनीचा संपूर्ण तपशील.
- निवास प्रमाणपत्र
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या