Top Recommended Stories

PM Modi Interview: 'जनता जनार्धन विकासाच्या बाजुने.. आम्हाला सेवेची संधी देईल'

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा, या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वृत्तसंस्था ANI शी विशेष संवाद साधला. ANI ला दिलेल्या खास इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधानांनी पाचही राज्यातील जनता विकासकामांच्या बाजुने आपला कौल देईल.

Updated: February 9, 2022 9:09 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

PM Modi Interview
पीएम मोदी

PM Modi Interview: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा, या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वृत्तसंस्था ANI शी विशेष संवाद साधला. ANI ला दिलेल्या खास इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधानांनी पाचही राज्यातील जनता विकासकामांच्या बाजुने आपला कौल देईल. भाजपला सेवेची संधी देईल. या निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपची लाट असल्याचे देखील त्यांनी मत मांडले.

Also Read:

पंतप्रधान म्हणाले, मी सर्व राज्यात असे पाहिले आहे की, भाजपच्या विरोधात कोणतीही लाट नाही. मतदारांच्या भाजपवर विश्वास आहे. ते भाजपच्याच बाजुने स्पष्ट बहुमत देतील. पाचही राज्यातील लोक भाजपला त्यांची सेवा करण्याची संधी देतील. ‘सबका साथ, सबका विकास’, असे सांगत भाजप जनहिताचे जनसेवेचे काम करत राहील.

You may like to read

उत्तर प्रदेशसाठी भाजपकडे योजना नाहीत… यावर काय म्हणाले पंतप्रधान?

उत्तर प्रदेशात भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही, भाजपकडे योजना नाहीत, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी टीका केली होती. त्यावर पंतप्रधान म्हणाले. देशात संध्या एक संस्कृती उदयाला आली आहे. आम्ही हे केले, आम्ही तेच करू असे आतापर्यंत इतर पक्षाचे नेत सांगत आले आहे. 50 वर्षांनंतरही कोणी ते काम केले तर ते सांगत आहे, की आम्ही हे त्यावेळी बोललो होतो. लोक काहीही सांगतात.

महिला घराबाहेर एकट्या पडू शकत नव्हत्या…

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आधीच्या सरकारच्या काळातील माफियाराजवर भाष्य केले. आधीच्या सरकारची कारकिर्द बारकाईने पाहिली तर तेथील महिला सुरक्षीत नव्हत्या. त्या एकट्या घराबाहेर देखील पडू शकत नव्हत्या. आधीच्या सरकारच्या काळात माफियाराज, गुंडाराज मोठ्या प्रमाणात फोफावला होता.

देशाचे पंतप्रधान जे म्हणाले तेच मी बोललो आहे. मी सांगितले की तेव्हा काय परिस्थिती होती, हे एका पंतप्रधानाचे विचार होते आणि आज काय परिस्थिती आहे, हे पंतप्रधानांचे विचार आहेत. जवाहरलाल नेहरूंबाबत संसदेत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी कोणाच्याही वडील, आई, आजोबा, आजोबा यांच्यासाठी काहीही बोललो नाही, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सबका साथ सबका विकास हे लक्षात घेऊनच जे असंभव होते ते संभव करून दाखवले आहे. त्यांच्या सरकारने राज्यात राबवलेली प्रत्येक योजना यशस्वी ठरली आहे. त्यांनी सर्व योजना वेळेत पूर्ण केल्या आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 9, 2022 9:02 PM IST

Updated Date: February 9, 2022 9:09 PM IST