Top Recommended Stories

Corona चं संकट अद्याप टळलेलं नाही... मुख्यमंत्र्याच्या संवादात आणखी काय म्हणाले पंतप्रधान मोदी

PM Modi Covid-19 Review Meeting: देशभरात पुन्हा एकदा कोविड-19 चा (Coronavirus) संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज, बुधवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. राज्या-राज्यातील कोरोना स्थिती आढावा घेत आहे. कोरोनाचं संकट Covid 19 अद्याप टळलेलं नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लस ही सुरक्षा कवच असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Published: April 27, 2022 1:56 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Corona चं संकट अद्याप टळलेलं नाही... मुख्यमंत्र्याच्या संवादात आणखी काय म्हणाले पंतप्रधान मोदी

PM Modi Covid-19 Review Meeting: कोरोनाचं संकट (Covid 19) अद्याप टळलेले नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लस (Corona Vaccine) ही ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. पंतप्रधान देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत आहेत. देशात पुन्हा एकदा कोविड-19 चा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Also Read:

कोरोना स्थिती आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या 2 वर्षांत कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत 24 बैठका झाल्या. कोरोनाच्या संकटात केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकत्र काम केले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देशाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. सर्व कोरोना वॉरियर्सचे कार्य कौतुकास्पद आहे. परंतु कोरोनाचे संकट अद्याप टकलेले नाही. कोरोनाचे आव्हानाला आपल्याला आणखी एकजुटीने तोंड द्यायचे आहे. कोरोनाचे व्हेरिएंट ओमिक्रॉन आणि त्याचे उपप्रकार पु्न्हा एकदा देशात गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. सध्या यूरोपातील देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट कसा थैमान घालतो आहे, हे आपण सगळे जण पाहात आहोतच. गेल्या काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

You may like to read

बूस्टर डोस महत्त्वाची भूमिका बजावेल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, की कोरोना विरुद्धच्या लढाईत बूस्टर डोस महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. बूस्टर डोस जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले आहे. कोरोना लस आणि बूस्टर डोस हे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे परस्पर सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य नियोजन केले म्हणूनच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो. भविष्यात देखील हे संकट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.