Top Recommended Stories

PMGKY scheme: पंतप्रधान मोदींचा 80 कोटी गरिबांना मोठा दिलासा, गरीब कल्याण योजनेचा कालावधी वाढवला

PMGKY scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील 80 कोटींहून अधिक गरीब जनतेसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Published: March 26, 2022 8:24 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

PMGKY scheme: पंतप्रधान मोदींचा 80 कोटी गरिबांना मोठा दिलासा, गरीब कल्याण योजनेचा कालावधी वाढवला
Pradhan Mantri Garib Kalyan Yojana

PMGKY scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी देशातील 80 कोटींहून अधिक गरीब जनतेसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKY scheme) मुदतवाढ मिळाल्याने पूर्वीप्रमाणेच 80 कोटींहून अधिक लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. ही योजना पुढील महिन्यापासून सप्टेंबर 2000 पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो मोफत गहू मिळेल. या योजनेमुळे 80 कोटींहून अधिक गरिबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

You may like to read

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून म्हणाले की “भारताची शक्ती देशातील प्रत्येक नागरिकाच्या सामर्थ्यात आहे. ही शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी सहा महिने सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना पूर्वीप्रमाणेच याचा लाभ घेता येणार आहे”. (PM Modi’s great relief to 80 crore poor, extended period of poor welfare scheme)

विशेष म्हणजे शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत कोविड-19 साथीच्या रोगादरम्यान सुरू झालेल्या मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी यांनी हे पाऊल उचलले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.