PNB Jobs 2022: : पीएनबीमध्ये विविध पदांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज जाणून घ्या पात्रता

पंजाब नॅशनल बँकने (PNB) विविध विशेष कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

Updated: January 8, 2022 1:54 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

PNB Jobs 2022: : पीएनबीमध्ये विविध पदांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज जाणून घ्या पात्रता
PNB Jobs 2022: Apply For 103 posts.

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकने (PNB) विविध विशेष कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या पदांसाठी पीएनबीने (PNB) अर्ज मागवले आहेत त्यात चीफ रिस्‍क ऑफ‍िसर (CRO), चीफ कंप्लायंस ऑफिसर (CCO), चीफ फायनांशिअल ऑफिसर (CFO), चीफ टेक्‍नीकल ऑफिसर (CTO), चीफ इन्फॉर्मेशन सिक्‍योरिटी ऑफिसर (CISO) आणि चीफ डिजिटल ऑफिसर (CDO) या पदाचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेने www.pnbindia.in वर अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

Also Read:

PNB Recruitment 2022: रिक्त पदांचा तपशील

चीफ रिस्क ऑफसर : 1
चीफ कंप्लायंस ऑफिसर : 1
चीफ फायनांशिअल ऑफिसर : 1
चीफ टेक्निकल ऑफसर : 1
चीफ इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसर : 1
चीफ डिजिटल ऑफिसर : 1

PNB Recruitment 2022: आवश्यक पात्रता आणि निकष

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी पूर्ण केलेले आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार अर्ज या पदांसाठी करू शकतात. तसेच अर्ज करण्यासाठी 45 ते 55 वयोगटातील असणे आवश्यक आहे. (PNB Jobs 2022 : Recruitment for various posts in PNB, apply now)

PNB Recruitment 2022: निवड प्रक्र‍िया

मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विचारात घेऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

PNB Recruitment 2022: असा करा अर्ज

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी भरलेला अर्ज जनरल मॅनेजर-एचआरएमडी, पंजाब नॅशनल बँक, एचआर डिव्हिजन, पहिला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिसर, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली- 110075 या पत्त्यावर पाठवावा. (General Manager-Hrmd Punjab National Bank Human Resource Division 1st Floor, West Wing, Corporate Office Sector 10, Dwarka”)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 1:54 PM IST

Updated Date: January 8, 2022 1:54 PM IST