Top Recommended Stories

Poco X4 Pro 5G ट्रिपल रीअर कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसरसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Poco X4 Pro 5G Launched in India : भारतातील ग्राहकांसाठी Poco X4 Pro 5G ची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने अधिकृतपणे हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Poco X3 Pro 5G ची अपग्रेडेड आवृत्ती आहे.

Published: March 28, 2022 2:38 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Poco X4 Pro 5G ट्रिपल रीअर कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसरसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Poco X4 Pro 5G

Poco X4 Pro 5G Launched in India : भारतातील ग्राहकांसाठी Poco X4 Pro 5G ची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने अधिकृतपणे हा स्मार्टफोन लॉन्च (Poco Smartphone) केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Poco X3 Pro 5G ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना पॉवर बॅकअपसाठी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. याशिवाय हा स्मार्टफोन ग्लॉसी बॉडी आणि तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध (Poco X4 Pro 5G Price in India) असेल. त्याची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया…

Poco X4 Pro 5G: किंमत आणि ऑफर

भारतीय बाजारपेठेत Poco X4 Pro 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या 6GB + 64GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांना आणि 8GB + 128GB मॉडेल 21,999 रुपयांना बाजारात लॉन्च करण्यात आहे. हा स्मार्टफोन लेझर ब्लॅक (Laser Black), लेझर ब्लू (Laser Blue) आणि पोको यलो (Poco Yellow) कलर व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. स्मार्टफोनची विक्री 5 एप्रिलपासून सुरू होणार असून तो फ्लिपकार्टवरून (Flipkart) खरेदी करता येईल.

You may like to read

Poco X4 Pro 5G च्या लॉन्चिंगसह काही ऑफर्सची देखील घोषणा करण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC Bank Card वापरल्यास 1,000 रुपयांचा इंस्टन्ट डिस्काउन्ट मिळेल. तुम्ही Poco X2, Poco X3 आणि Poco X3 Pro स्मार्टफोन वापरत असल्यास आणि Poco X4 Pro 5G वर अपग्रेड करायचे असल्यास तुम्हाला 3,000 रुपयांचा अॅडिशनल डिस्काउंट मिळेल.

Poco X4 Pro 5G: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Poco X4 Pro 5G स्मार्टफोन Android 11 OS वर आधारित आहे आणि यात ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,080×2,400 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP Samsung ISOCELL GW3 प्राथमिक सेन्सर आहे. तर 8MP अल्ट्रा वाइड शूटर आणि 2MP मॅक्रो शूटर देण्यात आले आहेत. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सुविधेसाठी यूजर्संना यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनच्या ग्लोबल वेरिएंटमध्ये 108MP चे प्राइमरी सेन्सर देण्यात आले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.