नवी दिल्ली : छोट्या गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस (Post office) ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. जर तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस (Post office) हा गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय आहे. कारण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी असते आणि सरकारी गॅरंटी (Government guarantee) देखील मिळते. ग्राहक देखील पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास जास्त पसंती दाखवतात. गुंतवणूक करुन तुम्हाला चांगल्या रिटर्नची हमी हवी असेल तर पोस्ट ऑफिसने एक अशी स्कीम आणली आहे यामध्ये तुम्हाला दिवसाला फक्त 100 रुपये जमा (deposit rs 100 per day) करावे लागतील. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला तब्बल 10 लाख रुपये (maturity get rs 10 lakh) मिळणार आहे.Also Read - Post Office Yojana: पोस्टाच्या या योजनेत गुतवणूक करून मिळवा दुप्पट परतावा; जाणून घ्या काय आहे योजना?

पोस्ट ऑफिसच्या या स्कीमचे नाव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) असे आहे. सध्या या स्कीमचा वार्षिक व्याज दर 7.1 टक्के आहे. या स्कीममध्ये तुम्हाला अर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. पोस्ट ऑफिसच्या या स्कीचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही स्कीम सुरु ठेवण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती 5-5 वर्षांच्या ब्लॉक्समध्ये देखील वाढवू शकता. कोणताही भारतीय व्यक्ती जो याठिकाणचा रहिवासी आहे तो या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकतो. Also Read - Post Office ची ग्राहकांसाठी नवीन सेवा, यापुढे घर बसल्या करा PPF, RD आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक!

पोस्ट ऑफिसमध्ये (Indian Post Office) गुंतवणूकदारांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाते. यासाठी गुंतवणूकीची सुरुवात लवकरात लवकर करणे गरजेचे असते. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेवढा नफा तुम्हाला होईल. अशामध्ये तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. कारण सध्या या स्कीमचा वार्षिक व्याज दर 7.1 टक्के (annual interest rate is 7.1 percent) आहे. दर तीन महिन्यांनी अर्थ मंत्रालय (Ministry of Finance) व्याजदराबाबत निर्णय घेत असते. Also Read - Post Office : पोस्टाच्या नियमात 1 एप्रिलपासून होणार मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम!

सध्याच्या व्याज दराच्या आधारे जर एखाद्या व्यक्तीने या स्कीममध्ये दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षांच्या मुदतीनंतर त्याला 9,89,931 रुपये मिळतील. या व्यक्तीने दररोज 100 रुपये जमा केल्यास वर्षाला 36,500 रुपये जमा होतील. अशाप्रकारे 15 वर्षातील एकूण ठेव रक्कम 5,47,500 रुपये होईल. याच दरम्यान, तुमचे व्याज उत्पन्न 4,42,431 रुपये होईल. अशाप्रकारे मॅच्युरिटीची एकूण रक्कम 9,89,931 रुपये होईल जी पूर्णपणे करमुक्त असेल.