Top Recommended Stories

Post Office PPF Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! 150 रुपयांच्या बचतीवर मिळवा 20 लाखांपर्यंतचा परतावा

Post Office PPF Scheme: पोस्टांच्या या योजनेमध्ये धोका नगण्य असून परतावा चांगला मिळू शकतो. ही योजना कशी आहे घ्या जाणून...

Published: February 5, 2022 5:30 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Post Office
Post Office/File Photo

Post Office PPF Scheme : भविष्यातील गरजा लक्षात घेत सुरक्षिततेसाठी लोक आपल्या क्षमतेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक (Investment ) करत असतात. काही जण जास्त परताव्यासाठी जोखीम घेत गुंतवणूक करतात. त्या तुलनेत बहुतांश जण जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यासाठी पोस्ट ऑफिस ( Post Office) हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टांच्या अशाच एका स्कीम बद्दल सांगणारा आहोत. ज्यात धोका नगण्य असून परतावा चांगला आहे. त्या स्कीमच नाव आहे पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ( post office PPF scheme ).

Also Read:

काय आहे योजना –

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेषत: मध्यमवर्गीयांमध्ये ( Middle class ) याची जास्त लोकप्रियता ( popular ) आहे. या स्कीममध्ये अनेक नेत्यांनी ( politician ) देखील गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे या योजनेत अगदी माफक गुंतवणुकीच्या दीर्घ मुदतीवर लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 150 रुपये गुंतवावे लागतील. या खात्यात मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षाचा असला तरी तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवू शकतात. या सोबत तुम्हाला या योजनेसोबत कर सूट देखील मिळते. या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. यासह दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळत 20 लाख रुपयांचा निधी होईल. जर तुमचे वय 25 वर्ष असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.

You may like to read

असे आहे गणित –

जर तुम्ही पीपीएफमध्ये ( PPF )दररोज 150 रुपयांची बचत केली तर ते मासिक 4, 500 रुपये होईल. दरमहा 4, 500 गुंतविल्यास वार्षिक गुंतवणूक 54 हजार होईल. त्यानुसार २० वर्षात ही रक्कम 10.80 लाख असेल. यावर वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ लावल्यास तुमचा निधी 20 वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक होतो.

कर लाभ देखील मिळतो –

पीपीएफ योजनेतून कर बचतीचा लभ देखील मिळतो. आयकर ( Income Tax ) कलम 80C अंतर्गत हा लाभ मिळतो. यामध्ये योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. पीपीएफमधील मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 5, 2022 5:30 PM IST