Top Recommended Stories

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; आता शेतकऱ्यांचे पैसे होणार दुप्पट!

शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळवून देण्यासाठी पोस्ट ऑफिसने (Post Office) एक जबरदस्त योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र योजना जाहीर केली आहे.

Updated: February 25, 2022 10:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

post office scheme
हर महीने मिलेगा 4950 रुपये ब्याज

Post Office Scheme : शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळवून देण्यासाठी पोस्ट ऑफिसने (Post Office) एक जबरदस्त योजना आणली आहे. पोस्ट ऑफिसने किसान विकास पत्र योजना जाहीर केली आहे. (Farmer Development Letter Scheme) या योजनेंतर्गत तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करून चांगला लाभ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ही योजना.

Also Read:

शेतकरी विकास योजना ही एक बचतीचा उत्तम मार्ग आहे. जी व्यक्तीला कोणत्याही जोखमीच्या भीतीशिवाय संपत्ती जमा करण्याची परवानगी देते. सरकारने सुरु केलेल्या लोकप्रिय योजनांपैकी ही एक योजना आहे. जी व्यक्तीला बचत करण्याची सवय लावते. शेतकरी विकास पत्र ही योजना 113 महिन्यांच्या पूर्वनिर्धारित कालावधीवर कार्य करते. आणि त्या पद्धतीने परतावा देते. भारतीय टपाल कार्यालये, निवडक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखेतून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

You may like to read

योजनेच्या लाभासाठी ही हवी कागदपत्रे…

किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायविंग लायसन्स आदी कागदपत्र आवश्यक आहे. यासह तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे अधिकृत संकेतस्थळ indiapost.gov.in वर जात ऑनलाईन अर्ज करत लाभ घेता येईल.

काय आहे योजना आणि खात्यांचे प्रकार…

सिंगल होल्डर प्रकार-

या प्रकारच्या खात्यामध्ये प्रौढ व्यक्तीला KPV प्रमाणपत्र दिले जाते.

संयुक्त A प्रकार –

या प्रकारच्या खात्यात KVP प्रमाणपत्र दोन नावाने दिले जाते. यामध्ये दोन्ही खातेदारांना मुदतपूर्तीच्या वेळी परतावा मिळतो. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास केवळ एकालाच ते मिळते.

संयुक्त B प्रकार-

या खात्यात दोन प्रौढ व्यक्तींच्या नावाने KVP प्रमाणपत्र दिले जाते. जॉईंट खाते प्रकारच्या खात्याप्रमाणे मुदतीनंतर एकाला किंवा वाचलेल्या व्यक्तीला रक्कम मिळते. या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

हे आहेत फायदे….

परताव्याची हमी-

ही योजना सुरक्षित असून ज्या व्यक्तीने पैसे गुंतवले आहे, त्याला बाजरातील अस्थिरता असूनही चांगला परतावा मिळतो.

प्रमाणपत्राविरुध्द् कर्ज-

व्यक्तींना शेतकरी विकासातील त्यांच्या गुंतवणुकीवर कर्ज मिळू शकते. या योजनेंतर्गत कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होते.

113 महिन्याचा कालावधी-

किसान पत्र योजनेची कालमर्यादा 113 महिने आहे. हा कालावधी पूर्ण केल्यावर योजना परिपक्व होते. आणि KVP धारकाला निधी प्राप्त होतो.

कर आकारणी कायदा-

या योजनेमध्ये मुदत पूर्व काढलेल्या रकमेवरील कर URS किंवा TDS च्या कापातीतून सूट देण्यात आली आहे.

पाहिजे तितकी गुंतवणूक-

या योजनेत खातेधारक किमान 1000 रुपये किंवा त्यांना पाहिजे तितकी गुंतणूक करू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 25, 2022 9:55 AM IST

Updated Date: February 25, 2022 10:00 AM IST