Top Recommended Stories

President Election 2022: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची ऑफर, आता 'ही' नावे चर्चेत

President Election 2022: देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या (President Election in India) पार्श्वभूमीवर चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची ऑफर नाकारली.

Published: June 16, 2022 8:52 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

President Election 2022: शरद पवारांनी नाकारली राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची ऑफर, आता 'ही' नावे चर्चेत

President Election 2022: देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या (President Election in India) पार्श्वभूमीवर चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची ऑफर नाकारली. त्यामुळे अद्याप उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत समान उमेदवार उभे करण्यास विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली आहे. मात्र, सक्रिय राजकारण सोडण्यास तयार नसलेले शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा एकमुखी उमेदवार होण्यास नकार दिला आहे.

आरिफ मोहम्मद खान, द्रौपदी मुर्मू, अनुसुईया उईके, तमिलसाई सुंदरराजन, सुमित्रा महाजन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांची नावे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आली आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवारावर एकमत होण्यासाठी 17 विरोधीपक्षांच्या नेत्यांची काल, बुधवारी दिल्लीत बैठक झाली. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, 18 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर एकमत होण्यासाठी राजनाथ सिंह आणि पक्षप्रमुख जेपी नड्डा यांना इतर पक्षांशी सल्लामसलत करण्याची जबाबदारी दिली आहे.

You may like to read

18 जुलै रोजी होणार्‍या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 30 जून रोजी कागदपत्रांची छानणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शेवटची तारीख 2 जुलै आहे. 18 जुलै रोजी निवडणूक होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. यानुसार, नामांकन प्रक्रिया सुरु झाली आहे.

पहिल्या दिवशी राष्ट्रपतिपदासाठी 11 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 29 जून आहे. दुसरीकडे, भाजप नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली आहे. त्याचबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली. राजनाथ सिंह हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि इतर राजकीय पक्षांचे नेते यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

फारुख अब्दुल्लांच्या नावाला ओमर अब्दुल्ला यांचा विरोध

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बुधवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत विरोधी पक्षांच्यावतीने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सर्व नेत्यांनी सुचवले. मात्र, शरद पवार यांनी आपण उमेदवार होणार नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधक नव्या उमेदवाराचा शोध घेत आहेत. या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांच्या नावावरही चर्चा झाली. मात्र, ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. आता उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची 21 जून रोजी पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.