Top Recommended Stories

Public Provident Fund: पीपीएफ मध्ये करा नियोजनबद्ध गुंतवणूक, निवृत्तीपूर्वी होऊ शकता मालामाल; जाणून घ्या कसे?

Public Provident Fund investmate : कोट्याधीश किंवा श्रीमंत होण्याची इच्छा सर्वांचीच असते. परंतु, असे केवळ काही लोकांनाच शक्य होते. कारण येणाऱ्या पैशांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे असते.

Published: February 21, 2022 4:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Public Provident Fund: पीपीएफ मध्ये करा नियोजनबद्ध गुंतवणूक, निवृत्तीपूर्वी होऊ शकता मालामाल; जाणून घ्या कसे?
The contributions made by the employee will be taxed and the employer contribution will remain tax-free.

Public Provident Fund investmate : कोट्याधीश किंवा श्रीमंत होण्याची इच्छा सर्वांचीच असते. परंतु, असे केवळ काही लोकांनाच शक्य होते. कारण येणाऱ्या पैशांचे व्यवस्थापन (Money management) योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे असते. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला आलेले पैसे योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी गुंतवता (Invest in right place) येणे आवश्यक आहे. गुंतवणुकीद्वारे अनेक लोकांचा फायदा झाला आहे. हे तुम्हाला ठाऊक असेलच. याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला शेअर मार्केटबद्दल (Stock market) माहिती नसेल तरी चालेल किंवा तुम्हाला म्यूचुअल फंड्सविषयी (Mutual funds) माहिती नसेल तरीही तुम्ही आपल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा फंड (Funds) जमा करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करायचे नाहीये फक्त Public Provident Fund मध्ये गुंतवणूक करायची आहे. तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्ही रिटायरमेंटपूर्वी (Retirement) कोट्याधीश होऊ शकता.

Public Provident Fund म्हणजेच PPF लाँग टर्म इन्व्हेस्टमेटसाठी (Long term investmate) एक चांगला पर्याय माणला जातो. यात तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. PPF मध्ये तुम्ही वर्षाला 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. म्हणजे महिन्याला 12,500 रुपये होतात. तुम्हाला कोट्याधीश व्हायचे असेल तर तुम्हाला महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि कधीपर्यंत करावी लागेल, हे आज अम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

You may like to read

PPF वर मिळते 7.1 टक्के व्याज

सरकार सध्या PPF खात्यावर 7.1 टक्के वार्षीक व्याज देते. यात 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या हिशोबाने महिन्याला 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास. 15 वर्षांनंतर त्याचे एकूण मुल्य 40 लाख 68 हजार 209 रुयपये होईल. यामध्ये एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये असतील. तर लाख 18 लाख 18 हजार 209 रुपये व्याजाचा समावेश असेल.

असा जमा होईल एक कोटी रुपयांचा फंड

जर तुम्ही 10 हजार रुपयांच्याऐवजी 7 हजार 500 रुपये दरमहा PPF मध्ये जमा केले तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षीपासून गुंतवणूक सुरू करावी लागेल.

  1. दरमहा 7,500 रुपये PPFमध्ये 15 वर्षांपर्यंत 7.1 टक्के व्याजाने जमा केल्यास एकूण रक्कम 24 लाख 40 हजार 926 रुपये जमा होतील.
  2. 5 वर्ष मुदत वाढवल्यास म्हणजे 20 वर्ष गुंतवणूक केल्यास ही रक्कम 39 लाख 94 हजार 973 रुपये होईल
  3. आणखी 5 वर्ष मुदत वाढवल्यास म्हणजे 25 गुंतवणूक केल्यास ही रक्कम 61 लाख 84 हजार 809 रुपये एवढी होईल.
  4. आणखी 5 वर्ष मुदत वाढवली म्हणजे 30 वर्षांनंतर ही रक्कम वाढून 92 लाख 70 हजार 546 रुपये होईल
  5. आणखी 5 वर्ष मुदत वाढवल्यास म्हणजे 35 वर्षांनतंर ही रक्कम वाढून 1 कोटी 36 लाख 18 हजार 714 रुपये एवढी होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.