Top Recommended Stories

PVC Aadhaar Card: आधुनिक सिक्युरिटीने सुसज्ज आहे पीव्हीसी आधार कार्ड, असे करा ऑर्डर

PVC Aadhaar Card : आधार कार्ड आजकाल कोणत्याही कामासाठी सर्वात आवश्यक कागदपत्र बनले आहे. सरकारी कामासाठी किंवा खासगी कामासाठी कुठेही गेल्यास आधी आधार कार्डाची मागणी केली जाते.

Published: January 27, 2022 8:01 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

PVC Aadhaar Card: आधुनिक सिक्युरिटीने सुसज्ज आहे पीव्हीसी आधार कार्ड, असे करा ऑर्डर
कितनी बार बदल सकते हैं नाम?

PVC Aadhaar Card | Aadhaar Card : आधार कार्ड आजकाल कोणत्याही कामासाठी सर्वात आवश्यक कागदपत्र (Required documents) बनले आहे. सरकारी कामासाठी किंवा खासगी कामासाठी कुठेही गेल्यास आधी आधार कार्डाची (Aadhaar Card) मागणी केली जाते. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्डशिवाय काम होणार नाही. पत्त्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्डाचा वापर केला जातो.

Also Read:

कागदी आणि लॅमिनेट केलेले आधार कार्ड बाळगणे कठीण होते. हे कार्ड पाण्यात भिजल्याने खाराब होऊ शकत होते. त्यामुळे आता UIDAI कडून आता पीव्हीसी आधार कार्ड देण्यात येत आहे. हे पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) तुम्ही सहज बाळगू शकता. तुमच्या खिशात किंवा पाकिटात देखील ठेऊ शकता ते खराब होण्याचे टेशन आता तुम्हाला नसेल. शिवाय आधार प्रिंटपेक्षा हे पीव्हीसी आधार कार्ड अधिक सुरक्षा फीचर्सनी युक्त आहे. हे पीव्हीसी आधार कार्ड एटीएम कार्ड (ATM) किंवा क्रेडिट कार्डसारखे (Credit Card) दिसते. तुम्ही ते तुमच्या वॉलेटमध्ये सहज ठेवू शकता. यासाठी वेगळ्या फाईलची गरज भासणार नाही. तुम्ही हे पीव्हीसी आधार कार्ड सहज ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईलवरून PVC आधार कार्ड ऑर्डर करता येईल.

You may like to read

UIDAI ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आता एका मोबाईल नंबरद्वारे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर (PVC aadhaar card) करू शकता. म्हणजेच आता संपूर्ण कुटुंबाचे पीव्हीसी आधार कार्ड सहज ऑर्डर करता येणार आहे.

एटीएम कार्डासारखे दिसणारे हे आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागेल. त्यात स्पीड पोस्टच्या खर्चाचाही समावेश आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे. PVC आधार कार्ड मिळवण्याचा सोपा मार्ग खाली दिला आहे.

असे ऑर्डर करा PVC आधार कार्ड?

सर्व प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in उघडा.
त्यानंतर ‘My Aadhaar Section’मधील ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.
Order Aadhaar PVC Card वर क्लिक करताच तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकावा लागेल.
या तीनपैकी कोणताही एक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड टाका.
त्यानंतर तळाशी Send OTP वर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
OTP एंटर केल्यानंतर खाली दर्शविलेल्या सबमिट वर क्लिक करा.
त्यानंतर स्क्रीनवर PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल.
त्यामध्ये तुमच्या आधारशी संबंधित तपशील असतील.
तुमचा मोबाईल क्रमांक आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसेल तर Request OTP समोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा.
हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल.
नवीन मोबाइल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला Send OTP बटणावर क्लिक करावे लागेल.
शेवटी पेमेंटचा पर्याय येईल.
त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व डिजिटल माध्यमातून 50 रुपये भरा.
त्यानंतर Aadhaar PVC Card ऑर्डर होईल.
काही दिवसांनी पीव्हीसी आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या घरी पोहोचेल.
Aadhaar PVC Card जास्तीत जास्त 15 दिवसांत तुमच्या घरी पोहोचेल.

पीव्हीसी आधार कार्ड आधुनिक सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज

UIDAI नुसार नवीन PVC कार्डांची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे. हे कार्ड दिसायला आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीव्हीसी आधार कार्ड पावसातही खराब होणार नाही. ते खिशात सहज बसेल. याशिवाय पीव्हीसी आधार कार्ड आधुनिक सुरक्षा फीचर्संनी सुसज्ज आहे. सुरक्षिततेसाठी या नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्ट असे फीचर्स आहेत. नवीन पीव्हीसी आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी QR कोडद्वारे त्वरित करता येईल. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 8:01 PM IST