दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने ( Sayukta Kisan Morcha) आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत देशव्यापी रेलरोको आंदोलनाची (Rail Roko Andolan) घोषणा केली आहे. या रेलरोको आंदोलनाला सुरुवात झाली असून शेतकरी रेल्वेच्या ट्रकवर बसून आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेचा (lakhimpur kheri violence case) निषेध करत केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी (Union Minister Ajay Mishra) यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी केली आहे. या आंदोलना (Farmer Protest) दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन केले जात आहे.Also Read - Lakhimpur Kheri Violent: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरण, केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अखेर अटक!

हरियाणातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बहादुरगड रेल्वे ट्रकवर बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अमृतसरच्या (Amrutsar) देवी दासपूरा गावामध्ये शेतकरी रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) धरणे आंदोलनाला बसले आहेत. या दरम्यान रेल्वेच्या संपत्तीला काहीच नुकसान पोहचवू नका आणि शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलन करा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. शेतकऱ्यांचे रेलरोको आंदोलन लक्षात घेता पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीवरुन (Deilhi Railway Station) रोहतक, पानीपत, सोनीपत, कुरुक्षेत्र, कैथल, बहादूरगड, अंबाला, जालंधर, लुधियाना, चंदीगड, अमृतसर, जम्मू, मेरठ, गाजियाबाद, शामली, सहारनपूर, मुरादाबाद या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर या आंदोलनाचा परिणाम होऊ शकतो. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ शकतो. या रेल्वे मार्गावर आधी देखील वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रेलरोको आंदोलन केले आहे. दरम्यान, आंदोलनक शेतकऱ्यांनी एकच मागणी केली आहे की, लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी या शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी केली आहे.