Top Recommended Stories

Railway Apprentice Recruitment 2022: सुवर्णसंधी! रेल्वेमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपच्या 2 हजारांपेक्षा अधिक पदांसाठी भरती, लवकर करा अर्ज!

Railway Apprentice Recruitment 2022: राज्यातील पाच क्लस्टरसाठी ही भरती होणार आहे. दहवी पास आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करु शकतात. 

Updated: February 7, 2022 10:08 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Indian Railways
Indian Railways

Railway Apprentice Bharti 2022: तुम्‍ही अ‍ॅप्रेंटिसशिपच्‍या (Apprentice) शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. भारतीय रेल्वेमध्‍ये (Indian Railway) अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणाची सुवर्णसंधी आली आहे. 2,395 अ‍ॅप्रेंटिसशिपच्या (Railway Apprentice Recruitment 2022) पदांसाठी ही भरती होणार आहे. राज्यातील पाच क्लस्टरसाठी ही भरती होणार आहे. दहवी पास आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करु शकतात.

Also Read:

ज्या उमेदवारांना अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज (apprentice bharati 2022) करायचा आहे ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती परीक्षेत विविध क्लस्टरद्वारे भरती केली जाणार आहे. ज्यांना अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज कराचा आहे त्यांनी तात्काळ अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी आहे.

You may like to read

अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी रिक्त जागा –

मुंबई क्लस्टर – 1650
भुसावळ क्लस्टर- 410
पुणे क्लस्टर -150
नागपूर क्लस्टर -110
सोलापूर क्लस्टर -75

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

रेल्वे अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. या उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेले असावे. उमेदवाराची वयोमर्यादा कमाल 24 वर्षे असावी. राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 10:08 AM IST

Updated Date: February 7, 2022 10:08 AM IST