Top Recommended Stories

Case Fild Against Sonia Gandhi PA: सोनिया गांधींच्या स्वीय सचिवांवर बलात्काराचा गुन्हा दाखल!

Case Fild Against Sonia Gandhi PA: महिलेच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या उत्तमनगर पोलिसांनी पी पी माधवन यांच्याविरोधात कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पी पी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने बलात्काराचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Published: June 28, 2022 8:12 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Rape Case
Rape Case

Case Fild Against Sonia Gandhi PA: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांच्या स्वीय सचिवांवर (Sonia Gandhi PA) एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पी पी माधवन (P P Madhavan) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पी पी माधवन यांनी नोकरी आणि लग्नाच्या आमीष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने (Rape Case) केला आहे. पीडित महिला ही दिल्लीची रहिवासी आहे. महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पी पी माधवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 71 वर्षीय पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने पोलिसामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, नोकरीच्या संदर्भात पी पी माधवनसोबत तिची ओळख झाली होती. पी पी माधवन यांनी तिच्याविषयी प्रेम व्यक्त करत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी संमतीशिवाय तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.’

You may like to read

तक्रारदार महिलेचा नवरा दिल्लीमधील काँग्रेसच्या कार्यालयात पोस्टर्स लावण्यासोबतच इतर कामं करत होता. पण फेब्रुवारी 2020 मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर ही महिला नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान ती माधवन यांच्या संपर्कात आली. पीडित महिलेने सांगितले की, माधवन यांनी तिला मुलाखतीच्या संदर्भात फोन केला होता. पी पी माधवन यांनी पीडितेला नोकरीचे आश्वासन दिले होते. या बहाण्याने ते महिलेशी व्हिडीओ कॉलवर बोलायचे. व्हॉट्सअॅपवर चॅट करायचे.

पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे, पी पी माधवन यांनी तिला सांगितले होते की त्यांचे तिच्यावर प्रेम आहे आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे आहे. त्यांनी या महिलेला नोकरी लावण्याचे आणि नंतर लग्न करण्याचे म्हणत संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. त्याचसोबत पीडित महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केला आहे.

पीडितेने तक्रारीत सांगितले की, ‘पी पी माधवन मला उत्तम नगर मेट्रो स्टेशन परिसरातील एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे एका कारमध्ये त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर फेब्रुवारी 2022 साली ते मला सुंदरनगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. तिथेही त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली होती.’ महिलेच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या उत्तमनगर पोलिसांनी पी पी माधवन यांच्याविरोधात कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पी पी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने बलात्काराचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. पी पी माधवन हे सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू मानले जातात. ते गेल्या अनेक वर्षांपासून सोनिया गांधींचे स्वीय सचिव म्हणून काम करत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.