Ration Card: रेशनकार्डवर कमी धान्य मिळते?, तात्काळ करा या नंबरवर तक्रार!
Ration Card: कोणत्याही रेशनकार्ड धारकाला आपल्या वाट्याचे धान्य मिळत नसेल तर ते टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

Ration Card: रेशनकार्ड (Ration Card) ही एक अशी वस्तू आहे ज्याद्वारे गरजूंना स्वस्त धान्य (Grain) मिळते. मात्र अनेकदा डीलर रेशनचे धान्य देताना कमी धान्य देत नागरिकांची फसवणूक (Cheating) करतात ही बाबा निदर्शनात आली आहे. तुमच्याही निदर्शनात ही बाबा आली असेल तर तुम्ही याबाबत तक्रार (Complaint) करू शकतात. सरकारतर्फे याबाबत प्रत्येक राज्यात हेल्पलाईन नंबर (Helpline Number) जारी करण्यात आले आहे. यावर तुम्ही कमी धान्य देणाऱ्या डिलरची तक्रार करू शकतात. भ्रष्टाचार कमी करत धान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. कोणत्याही रेशनकार्ड धारकाला आपल्या वाट्याचे धान्य मिळत नसेल तर ते टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
Also Read:
असा मिळावा टोल फ्री नंबर (Get a toll free number like this) –
धान्य कमी मिळत असेल तर तक्रार करण्यासाठी राज्याचा टोल फ्री नंबर https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर क्लिक करून मिळवू शकतात. यासह रेशनकार्डबाबत अर्ज करू देखील शकतात. अनेक महिन्यांपर्यंत रेशनकार्ड मिळत नसेल तर याबबाबत सुद्धा तुम्हाला इथे तक्रार करता येते. महाराष्ट्रासाठी 1800-22-4950 हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर (Ration Card Maharashtra Helpline Number) देण्यात आला आहे.
असे बनवा तुमचे रेशनकार्ड (How to Apply For Ration Card)-
रेशनकार्ड बनविण्यासाठी सर्वात आधी राज्याच्या अधिकृत बेवसाईवर जावं लागेल. रेशनकार्डसाठी आयडी प्रूफ म्हणून आधारा कार्ड (Aadhaar Card), मतदान कार्ड (Voter ID), पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. यासह 5 ते 45 रुपयांपर्यंतची फी द्यावी लागेल. अर्ज सबमिट झाल्यानंतर तो अर्ज फिल्ड व्हेरिफिकेशनसाठी (Field Verification) पाठवला जातो. त्यानंतर अधिकारी अर्जात भरलेली माहितीची चौकशी करतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या