नवी मुंबई : रेशन कार्ड धारकांसाठी (Ration Card Holders) केंद्र सरकारने (Central Government) महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने गरीबांसाठी 4 महिन्यांपर्यंत म्हणजे नोव्हेंबरपर्यंत रेशन मोफत (free grain) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत गरीबांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्यासोबतच इतर फायदे देखील दिले जाणार आहे. कोरोनाच्या (Coronavirus) काळात हातात काम नसल्यामुळे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.Also Read - Maharashtra Corona Update : चिंताजनक! महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 459 नवे रुग्ण, पाच बाधितांचा मृत्यू

कोरोना (Covid 19) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) फटका देशातील सर्व नागरिकांना बसला आहे. याचा सर्वात जास्त फटका गरीब, कष्टकरी आणि कामगार वर्गाला बसला आहे. अशामध्ये या सर्वांसाठी केंद्र सरकारने (Government of india) कोरोनाच्या काळात मोफत धान्य योजना (Free grain scheme) सुरु केली होती. या योजनेत चार महिन्यांची मुदत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गरीबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन मिळणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे असलेल्या या संकटाच्या काळात त्यांना याचा फायदा होणार आहे. Also Read - Ban On PFI: पीएफआयवर पाच वर्षांची बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाचा महत्वाचा निर्णय!

कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गरीबाला धान्य मिळावं आणि कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे. परंतू या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशनकार्ड (Ration Card) असणे गरजेचे आहे. दरम्यान, रेशनकार्ड हे सर्वांसाठी खूप महत्वाचे कार्ड आहे. गरीब असो वा श्रीमंत (poor or rich) सर्वांसाठी रेशन कार्ड अत्यावश्यक कार्ड आहे. रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून देखील वापरले जाते. त्यासोबतच रेशन कार्डचा उपयोग फक्त धान्य मिळवण्यासाठी होत नाही तर अनेक सुविधा मिळवण्यासाठी देखील होतो. गॅस सिलेंडर (Gas cylinder ) मिळवण्यासाठी, बँकेशी संबंधित कामासाठी (bank related work) रेशन कार्डचा उपयोग होतो. Also Read - IPL 2023: पुढील वर्षापासून बदलेल आयपीएलचे स्वरूप, सौरव गांगुलींनी केले कंफर्म!