RBI Alert: आरबीआयकडून ग्राहकांना अलर्ट, फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमल करा रजिस्टर!

कोणतीही फसवणुकीची घटना घडल्यास तात्काळ तुमच्या बँकेला कळवा, असे आवाहन आरबीआयने ग्राहकांना केले आहे.

Updated: January 6, 2022 4:17 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

online fraud
online fraud

RBI Alert: सध्या बँकांमध्ये फसवणुकीच्या घटना सामान्य होत चालल्या आहेत. कधी ऑनलाइन (Online Fraud) तर कधी ऑफलाइन (Offline Froud) पैसे काढताना बँकेच्या ग्राहकांची (Bank Customers) फसवणूक होते. सध्या अशा अनेक टोळ्या सक्रीय आहेत ज्यांची नजर नेहमीच ऑफलाइन किंवा ऑनलाइन बँकिंगवर (Online and Offline Banking) असते. अशा परिस्थितीत फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ( Reserve Bank of India) वतीने ग्राहकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या बँक अकाऊंटला (Bank Account) त्यांचा मोबाईल नंबर (Mobile Number) आणि ईमेल आयडी (Email ID) नोंदणी करणे आवश्यक आहे, असा अलर्ट देण्यात आला आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ग्राहकांना तत्काळ माहिती मिळू शकेल. अशी कोणतीही फसवणुकीची घटना घडल्यास तात्काळ तुमच्या बँकेला कळवा, असे देखील आवाहन आरबीआयने ग्राहकांना केले आहे.

Also Read:

याआधी आरबीआयने बँकेच्या ग्राहकांना केवायसी अपडेटच्या (KYC Update) नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध केले होते. एका निवेदनात आरबीआयने सांगितले आहे की, केवायसी अपडेटच्या नावाखाली ग्राहक फसवणुकीला बळी पडत असल्याच्या अनेक तक्रारी/अहवाल प्राप्त होत आहेत. बँकेने सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये नेहमीच्या पद्धतींमध्ये ग्राहकाकडून काही वैयक्तिक तपशील, खाते/लॉगिन तपशील/कार्ड माहिती, पिन शेअर करण्याची विनंती करणारे कॉल, एसएमएस, ईमेल इत्यादीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ओटीपी, किंवा दिलेली लिंक वापरून केवायसी अपडेटसाठी काही अनधिकृत / असत्यापित एप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते.

असे संप्रेषणाकडून बँक अकाऊंट फ्रीज/ब्लॉक/बंद करण्याची धमकी देखील दिली जाते. एकदा ग्राहकाने कॉल/मेसेज/अनधिकृत ऍप्लिकेशनवर (call / message / unauthorized application) माहिती शेअर केली की, फसवणूक करणारे ग्राहकाच्या खात्यात प्रवेश करतात आणि फसवणूक करतात. आरबीआयने सांगितले आहे की, ‘जनतेला सतत सावध केले जाते की खाते लॉगिन तपशील, वैयक्तिक माहिती, केवायसी दस्तऐवजांच्या प्रती, कार्ड माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी इत्यादी माहिती अज्ञात व्यक्ती किंवा एजन्सीसोबत शेअर करू नका. याव्यतिरिक्त या पद्धतीचे तपशील असत्यापित/अनधिकृत वेबसाइट किंवा एप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर केले नाही पाहिजे.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 4:16 PM IST

Updated Date: January 6, 2022 4:17 PM IST