RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. त्याअंतर्गत आरबीआयने (उच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. . या भरती प्रक्रियेद्वारे आरबीआयमधील एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Reserve Bank of India Jobs 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. त्याअंतर्गत आरबीआयने (RBI Jobs 2022) उच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RBI मध्ये नोकरी शोधणारे उमेदवार rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर (Official Site) जाऊन या पंदांसाठी अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे. या भरती प्रक्रियेद्वारे (RBI Recruitment 2022) आरबीआयमधील एकूण 14 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारंनी आरबीआयची भरती (RBI Vacancy 2022) संदर्भातील अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वीक वाचावी असा सल्ला देण्यात आला आहे.
Also Read:
- RBI Monetary Policy Committee: मोठी बातमी! कर्जदारांना पुन्हा झटका! रिझर्व्ह बँकेने रेपो दर पुन्हा वाढवला
- TMC Recruitment 2022: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 164 पदांसाठी भरती, 60,000 रुपये पगार; जाणून घ्या पात्रता
- ITBP Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती! ही आहे पात्रता
RBI Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील
– विधी अधिकारी ग्रेड बी, व्यवस्थापक (Technical-Civil)
– व्यवस्थापक (Technical-Electrical)
ग्रंथपाल व्यावसायिक – ग्रेड ए (Assistant Librarian)
– आर्किटेक्ट ग्रेड ए (Architect)
– पूर्णवेळ क्युरेटर
– एकूण 14 पदे
RBI Recruitment 2022 : अर्ज करण्याची शेवटची तारीख
ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल याची अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. 15 जानेवारी 2022 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लेखी परीक्षा 6 मार्च 2022 रोजी घेतली जाईल. या पदांवर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार येत्या 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
RBI Recruitment 2022 : अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क 600 रुपये असेल तर एससी/एसटी/ पीडब्ल्यूबीडी वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये असेल. (RBI Recruitment 2022: Recruitment for various posts in Reserve Bank of India, apply now )
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या