Realme 9i बजेट रेंज स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरू, जाणून घ्या बेस्ट ऑफर्स आणि बरंच काही
Realme 9i स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला. हा कंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून तो Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह पावरफुल बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे.

Realme 9i Sale in India: Realme 9i स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात (Realme 9i Price in India) लॉन्च करण्यात आला. हा कंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून तो Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह पावरफुल बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे. याशिवाय ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देखील आहेत. जर तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर (Flipkart Sale) हे लक्षात घ्या की तो आजपासून म्हणजेच 25 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध (Realme 9i Discount and Offers) झाला आहे.
Also Read:
Realme 9i: किंमत आणि ऑफर
Realme 9i मध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे आणि त्याची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरून देखील हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank Credit Card वापरल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
Realme 9i: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Realme 9i मध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे आणि तो Android 11 OS वर आधारित आहे. यात 1,080 x 2,412 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन octa-core Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो आणि उत्कृष्ट ग्राफिक्स क्वालिटीसाठी त्यात Adreno 610 GPU देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये दोन रॅम मॉडेल्स देण्यात आली आहेत आणि यासोबत Dynamic RAM Expansion सपोर्ट देखील उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी Realme 9i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचे प्रायमरी सेन्सर 50MP चे आहे तर त्यात 2MP चे पोर्ट्रेट शूटर आणि 2MP मायक्रो शूटर देण्यात आले आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यूजर्संना या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 33W Dart Charge सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे ज्याच्या मदतीने यूजर्स 1TB पर्यंत डेटा वाढवू शकतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या