Top Recommended Stories

Realme 9Pro+5G स्मार्टफोनची विक्री सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

Realme 9Pro+5G Smartphone : तुम्हाला जर यामधील एखदा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही realme.com किंवा Flipkart वर ऑनलाइन खरेदी करू शकता.

Published: February 21, 2022 6:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Realme 9 Pro 5G
Realme 9 Pro 5G

Realme 9Pro+5G Smartphone: Realme कंपनीचा (Realme Company) स्मार्टफोन (Realme Smartphone) घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. Realme कंपनीच्या Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोनची भारतामध्ये आजपासून विक्री सुरू झाली आहे. तुम्हाला जर यामधील एखदा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही realme.com किंवा Flipkart वर ऑनलाइन खरेदी करू शकता. महत्वाचे म्हणजे तुम्ही या दोन्ही वेबसाइटवर HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट करत असाल तर तुम्हाला Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro + 5G स्मार्टफोनवर दोन हजार रुपयांची सूट मिळेल. या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत आज आपण जाणून घेणार आहोत…

Also Read:

या स्मार्टफोनच्या किमती घ्या जाणून –

Realme 9 Pro 5G या स्मार्टफोनची भारतात किंमत 17,999 रुपयांपासून सुरू होते. 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. तर Realme 9 Pro + 5Gच्या 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर टॉप-ऑफ-द-लाइन 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे.

You may like to read

Realme 9 Pro 5Gचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स –

रियलमीच्या या स्मार्टफोनबद्दल सांगायचे झाले तर, हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर चालतो. जे रियलमी UI 3.0शी जोडलेले आहे आणि 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.6 – इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी पॅनेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC, Adreno 619 JPU आणि 8 GBपर्यंत रॅमसह समर्थित आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. जो 64 MP प्रायमरी कॅमेरा, f1.79 लेन्ससह 8 MP वाइड-एंगल शूटर आणि 2 MP Micro Lance आहे. तर 16 MPचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/A-GPS, USB Type-C आणि 3.5 MM हेडफोन आहे. याशिवाय, यामध्ये 5000 MAH बॅटरी आहे आणि 33 वॅट डार्ट चार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme 9 Pro+ 5Gचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स –

Realme 9 Pro+ 5G हा स्मार्टफोन देखील अँड्रॉइड 12वर आधारित आहे. रियलमी UI 3.0 सह येतो. स्मार्टफोनमध्ये 90 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.4 इंचाचा फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास पाच प्रोटेक्शन आणि 18- एचझेडचा टच सॅम्पलिंग रेट देतो. Realme 9 Pro+ मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 920 SoC आणि 8GBपर्यंत LPDDR4X रॅम आहे. Realme 9 Pro + 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 50 MP सोनी IMX766 प्रायमरी सेन्सर आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अल्ट्रा-वाइड लेन्ससह 8 MP सोनी IMX355 सेन्सर आणि 2 MP मॅक्रो शूटरचा समावेश आहे. तर Realme 9 Pro+ मध्ये f/2.4 लेन्ससह 16 मेगापिक्सेलचा सोनी IMX471 सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, USB-Type-C आणि 3.5 MM हेडफोन जॅक समाविष्ट आहे. फोनमध्ये 4500 MAH बॅटरी आहे. G60 ६० वॅट सुपरडार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 21, 2022 6:56 PM IST