Realme स्मार्टफोन निर्माता कंपनीनं आपला Narzo 30 5G स्मार्टफोनचं स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. कंपनीनं यात 4GB RAM + 64GB स्टोरेज दिला आहे. Realme Narzo 30 5G हा स्मार्टफोन केवळ 6GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 15,999 रुपये या स्मार्टफोनची किंमत आहे. नुकतंच कंपनीनं याचं 4G व्हेरिएंट देखील लॉन्च केलं आहे.Also Read - Terror Attack: सणासुदीच्या काळात ISI हल्ला करण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी!

कंपनीनं नवा व्हेरिएंट Realme Fan Festivalच्या आधीच लॉन्च केलं आहे. Realme Fan Festival 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे. फेस्टिव्हल 28 ऑगस्टपर्यत सुरू राहिल. फेस्टिव्हलमध्ये स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्सवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. Also Read - Ford कंपनीनं भारतातील दुकान गुंडाळलं! कार खरेदीसाठी करावी लागेल अशी कसरत

Realme Narzo 30 5G च्या नव्या व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Realme Indiaच्या वेबसाइटसोबत फ्लिपकार्ट आणि दूसरे ऑनलाइन स्टोअर्सवर 24 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. याआधी कंपनीनं हा स्मार्टफोन 6GB RAM + 128GB स्टोरेजमध्ये लॉन्च केला होता. याची किंमत 15,999 रुपये होती. रेसिंग ब्लू आणि रेसिंग सिल्व्हर या दोन कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. Also Read - Realme Narzo 50A ची डिझाईन लीक, बॅक कॅमेरा सेटअपसह बॉटममध्ये स्पीकर ग्रिल

स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या यह स्मार्टफोन 6.5-inch चा full-HD+ (1,080×2,400 pixels) रेज्युलेशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन octa-core MediaTek Dimensity 700 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB पर्यंत RAMचा सपोर्ट मिळतो. हालांकि, लेटेस्ट व्हर्जन 4GB RAM + 64GB स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे.

मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज वाढवता येतं. Realme Narzo 30 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. मेन लेंस 48MP आहे. याशिवाय फोनमध्ये 2MPचा मोनोक्रोम सेंसर आणि 2MP चा मायक्रो सेंसर मिळतो. फ्रंटमध्ये कंपनीनं 16MPचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे. फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे. ती 18Wच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.