Top Recommended Stories

Realme Narzo 50A ची डिझाईन लीक, बॅक कॅमेरा सेटअपसह बॉटममध्ये स्पीकर ग्रिल

Realme Narzo 50A स्मार्टफोन भारतात Oxygen Green आणि Oxygen Blue कलरमध्ये लॉन्च होईल.

Updated: August 26, 2021 11:49 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Realme Narzo 50A ची डिझाईन लीक, बॅक कॅमेरा सेटअपसह बॉटममध्ये स्पीकर ग्रिल

Realme Narzo 50A ची डिझाईन लीक झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपालून BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर हा स्मार्टफोन पाहाण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतीय बाजारात लॉन्च होणार असल्याचं कन्फर्म झालं आहे. विशेष म्हणजे कंपनी Narzo 30 सीरीजनंतर थेट Narzo 50 नावानं आपला फोन मार्केटमध्ये सादर करत आहे. Narzo 50A स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले होते. आता या फोनची डिझाईन लीक झाली आहे. चला तर मग जाणून घेवू या Realme Narzo 50A च्या स्पेसिफिकेशनबाबत…

Also Read:

Realme Narzo 50A design

प्रसिद्ध टिप्स्टर OnLeaks नं 91Mobiles च्या माध्यमातून Narzo 50A चे रेंडर सादर केले आहेत. पब्लिकेशननुसार हे अधिकृत रेंडर आहे. या रेंडर इमेजमध्ये Narzo 50A स्मार्टफोनच्या बॅकसाईटवर एक ड्युअल टोन डिझाईन दिसत आहे. Narzo 30A मध्ये देखील एक ड्युअल-टोन डिझाइन होती. मात्र, या फोनमध्ये डिझाईनचा डिव्हाइड व्हर्टिकल झाला आहे. तो कॅमेरा मॉड्यूलमधून बाहेर निघतो.

You may like to read

या डिव्हाइसमध्ये कॅमेरा मॉड्यूल खूप वेगळा आणि मोठा दिसत आहे. कॅमेऱ्याच्या मेन यूनिटमध्ये तीन लेंस बसवलेले दिसत आहे. एक LED फ्लॅश लाईट आहे. याच्या खावी कॅमेरा मोड्यूलमध्येच फिंगरप्रिंट सेंसर बसवलेला आहे.

Realme Narzo 50A च्या बॉटममध्ये एक स्पीकर ग्रिल आहे. एक USB टाइप-C चार्जिंग पोर्ट आहे. एक माईक असून एक 3.5mm ऑडियो जॅक आहे. फोनची डावी बाजू पूर्ण पणे प्लेन आहे तर उजव्या बाजुला पॉवर बटण आणि वॉल्यूम रॉकर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये समोर एक नॉच डिस्प्ले आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Realme Narzo 50A स्मार्टफोन भारतात Oxygen Green आणि Oxygen Blue कलरमध्ये लॉन्च होईल. या डिव्हाइसमध्ये 4GB RAM सोबतच यूजर्सला 64GB आणि 128GB स्टोरेजचा ऑप्शन देखील मिळेल. RMX3430 असा डिव्हाइस मॉडल नंबर आहे. फोनला बॅक साईडला एक 12.5MPचा मेन कॅमेरा आहे. तो 4080×3072 रेज्युलेशनची पिक्चर क्लिक करेल. 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: August 26, 2021 11:49 AM IST

Updated Date: August 26, 2021 11:49 AM IST