मुंबई : Redmi Note 10 सीरीजमध्ये कंपनीने पावरफुल फीचर्स असलेला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 टी (Redmi Note 10T) बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन सध्या रशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेल्या Poco M3 Pro 5G आणि युरोपमध्ये लॉन्च झालेल्या Redmi Note 10 5G चा रिब्रँडेड व्हर्जन आहे. हा MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला असून फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंट आणि मल्टीपल कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.Also Read - New Oppo smartphone : 'ओप्पो'ने लाँच केला 13 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi Note 10T: किंमत

Redmi Note 10T रशियामध्ये सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला असून त्याची किंमत RUB 19,990 म्हणजेच सुमारे 20,500 रुपये आहे. यात 4GB रॅमसह 128GB जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हा स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 6GB + 128GB अशा इतर दोन व्हेरिएंटमध्ये देखील लिस्टेड आहे. परंतु त्यांची किंमत आणि उपलब्धता याविषयी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन ब्लू, ग्रीन, ग्रे आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. Also Read - Redmi Note 10T असेल बजेट रेंज स्मार्टफोन; जाणून घ्या किती असेल किंमत

Redmi Note 10T: वैशिष्ट्ये

Redmi Note 10T मध्ये 1,080×2,400 पिक्सलच्या स्क्रीन रिजोल्यूशनसह 6.0 इंचाचा फुल एचडी + डिस्प्लेसह येतो. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि punch AdaptiveSync ने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 ओएसवर कार्य करतो. पॉवर बॅकअपसाठी त्यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. Also Read - Redmi Note 10T ची launch date जाहीर; भारतात या दिवशी लॉन्च होणार पहिला 5G स्मार्टफोन

कनेक्टिव्हिटीसाठी अद्यावत फीचर्स

फोटोग्राफीसाठी वापरकर्त्यांना Redmi Note 10T मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचे प्रायमरी सेंसर 48MP चे आहे, तर त्यात 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देखील देण्यात आले आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीच्या सुविधेसाठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम स्लॉट, 4G, एनएफसी, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. फोनचे वजन केवळ 190 ग्रॅम आहे.