Top Recommended Stories

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 'या' तारखेला लॉन्च होणार

स्मार्टफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे. Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 5 जानेवारी 2023 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.

Published: December 20, 2022 1:03 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Redmi Note 12 Pro 5G
Redmi Note 12 Pro 5G

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात येत्या 5 जानेवारी 2023 ला लॉन्च होणार आहे. यासोबतच Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन देखील लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार,दोन्ही मिडरेंज स्मार्टफोन्स Note 12 series च्या धर्तीवर लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान, Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro + आधी चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.

Redmi च्या अधिकृत वेबसाइटवर एक टीझर इमेज जारी करण्यात आली आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात पुढील वर्षी 5 जानेवारी 2023 ला लॉन्च करण्यात येणार आहे. या फोनमध्ये बॅक पॅनल देण्यात आले आहे. तसेच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. रेडमीच्या टीझरमध्ये Redmi Note 12 Pro 5G चे काही खास स्पेसिफिकेशन्स देखील सांगण्यात आले आहेत.

You may like to read

अपकमिंग हँडसेटमध्ये फ्लॅगशिप हॅप्टिक एक्सपीरिएन्स देखील मिळेल. मात्र, कंपनीने Redmi Note 12 Pro 5G च्या भारतीय बाजारातील किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. चीनमध्ये हा फोनची किंमत CNY 1699 (जवळपास 19,300 रुपये) ला लॉन्च करण्यात आला होता.

जाणून घ्या Redmi Note 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

टीझरनुसार, Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये बॅक साईडला ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसोबत 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro + 5G स्मार्टफोन देखील त्याच दिवशी लॉन्च करण्यात येईल.

Redmi Note 12 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबतच Pro AMOLED डिस्प्ले देखील मिळेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे. मात्र, चार्जिंग तसेच बॅटरीबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. 15 मिनिटांच्या चार्जिंगवर फोन दिवसभर चालेल, अशी चर्चा सुरू आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.