Reliance Jio Cheapest Plan: Jioचा जबरदस्त प्लॅन! 336 दिवसांपर्यंत अनलिमिटडेट कॉलिंगसह बरेच फायदे!
Reliance Jio Cheapest Plan: जिओचा हा प्रीपेड प्लॅन जो एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ला टक्कर देऊ शकतो. या प्लॅनविषयी घ्या जाणून...

Reliance Jio Cheapest Plan : दिग्गज रिलायन्स जिओ (Reliance Jio) कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करण्याची संधी सोडत नाही. रिलायन्स कंपनी दररोज नवनवीन योजना आणि फायदे युजर्ससाठी सादर करत असते. तुम्हाला जिओचे अनेक सर्वात स्वस्त आणि अधिक फायदेशीर प्लॅन माहिती असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जिओच्या प्रीपेड प्लॅनबद्दल (Jio Prepaid Plan) माहिती देत आहोत जो एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ला टक्कर देऊ शकतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे याची वैधता 336 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…
Also Read:
जिओचा 899 रुपयांचा प्लॅन –
Jio च्या 899 रुपयांच्या प्लॅनबद्दल (Jio Rs 899 Plan) सांगायचे झाले तर, हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दरमहा 2GB डेटा मिळतो. म्हणजेच, संपूर्ण वैधतेदरम्यान तुम्ही एकूण 24GB डेटाचा लाभ घेऊ शकता. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे आणि खास गोष्ट म्हणजे यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. एवढेच नाही तर प्लॅनसोबत तुम्हाला दर महिन्याला 50 एसएमएस (SMS) देखील मिळतील. यासोबतच, Jio Cinema, Jio TV सोबत, Jio Security आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील दिला जात आहे.
जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन (Reliance Jio Cheapest Plan) –
Jioचा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. जो 28 दिवसांच्या वैधतेसह येते. हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर Jio Phone ऑल इन वन प्लॅन्सच्या यादीमध्ये आहे. फक्त JioPhone वापरकर्ते याचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 एमबी डेटा (100 MB Data) मिळतो. सोबतच कंपनी 200MB अतिरिक्त डेटा देखील देत आहे. याचा अर्थ तुम्ही संपूर्ण वैधता कालावधी दरम्यान 3GB डेटा मिळवू शकता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या