Top Recommended Stories

JIO ने लॉन्च केले 2 धमाकेदार Recharge Plan! असे बेनिफिट्स कुठेच मिळणार नाही!, जाणून घ्या डिटेल...

जिओने आपल्या यूजर्सला सुविधा देण्यासाठी दोन नवे रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. ते अद्याप दुसऱ्या टेलिकॉम कंपनीने (Disney+ Hotstar Free Subscription) आपल्या यूजर्सने दिलेले नाहीत. Jio यावेळी 2 प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत.

Published: February 23, 2022 8:38 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Reliance Jio suffers major outage
Reliance Jio suffers major outage

Jio Recharge Plan: जिओने आपल्या यूजर्सला आणखी सुविधा देण्यासाठी दोन नवे रिचार्ज प्लान लॉन्च केले आहेत. या प्लानमध्ये यूजर्सला जास्त बेनिफिट्स मिळणार आहे. ते अद्याप दुसऱ्या टेलिकॉम कंपनीने (Disney+ Hotstar Free Subscription) आपल्या यूजर्सने दिलेले नाहीत. Jio यावेळी 2 प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत.

Also Read:

दोन्ही नव्या प्लान्समध्ये यूजर्सला Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लानचे वैशिष्ट्य म्हणजे यूजर्य Disney+ Hotstar चा वापर केवळ मोबाइलवर नाही तर टीव्हीवर देखील करू शकतात. 1,499 रुपये आणि 4,199 रुपये असे प्रीप्रेड प्लानचे दर आहेत. चला तर मग जाणून घेऊ या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबाबत डिटेल माहिती…

You may like to read

काय आहेत बेनिफिट्स…

Jio ने बाजारात 1,499 आणि 4,199 रुपये किमतीचे दोन प्रीपेड प्लान्स लॉन्च केले आहेत. या दोन्ही प्लान्सचे वैशिष्ट्य म्हणजे यात यूजर्सला Disney+ Hotstar Premium चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे यूजर्स Disney+ Hotstar Premium चा वापर एकाच वेळी 4 डिव्हाइसेजवर करू शकतात. मोबाइलसोबतच लॅपटॉप, टॅबलेट आणि टीव्हीवर Disney+ Hotstar Premium चा आनंद घेऊ शकतात. आतापर्यंत कंपनी केवळ मोबाइल सब्सक्रिप्शनच उपलब्ध करून देत होती.

Jio चा 1,499 रुपयांचा प्लान

Jio च्या 1,499 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला Disney+ Hotstar Premium चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. सोबतच 3GB डेली डेटा देखील मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवसांची असेल. यात यूजर्स एकूण 168GB डेटाचा लाभ घेऊ शकतात. या शिवाय अलावा अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची देखील सुविधा मिळणार आहे.

Jio चा 4,199 रुपयांचा प्लान

Jio च्या या प्लानची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये यूजर्सला Disney+ Hotstar Premium चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. सोबतच 3GB डेली डेटा मिळेल. व्हॅलिडिटीदरम्यान यूजर्स 1825GB डेटाचा लाभ घेता येईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच 100 एसएमएस देखील फ्री मिळतील.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 8:38 PM IST