Top Recommended Stories

Republic Day 2022: इतिहासात पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार प्रजासत्ताक दिनाची परेड, जाणून घ्या कारण

भारत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड सुमारे अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा सकाळी दहाच्या नियोजित वेळेऐवजी सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल.

Published: January 18, 2022 5:43 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Republic Day 2022: इतिहासात पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार प्रजासत्ताक दिनाची परेड, जाणून घ्या कारण
One marching contingent each of the Indian Air Force and the Indian Navy will also participate in RDP-2022.

Republic Day 2022: भारत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करतो. यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade) सुमारे अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा सकाळी दहाच्या नियोजित वेळेऐवजी सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल. अधिकाऱ्यांनी याचे कारण कोरोना प्रतिबंध (Corona restriction) आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली (Tribute to the security personnel) अर्पण करणे असल्याचे सांगितले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की “दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade Time) सकाळी 10 वाजता सुरू होत असते परंतु यावर्षी ती सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.”

Also Read:

90 मिनिटांची असेल परेड

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की “कोविड-19 निर्बंधांमुळे परेडला उशीर होईल. याशिवाय परेड सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हा परेड सोहळा गेल्या वर्षीप्रमाणे 90 मिनिटांचा असेल. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. यानंतर परेडमध्ये सहभागी होणारे दल मार्च करतील. ज्यात तिन्ही दलाचे जवान परेड करतील आणि देशाची सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती दर्शविणारी चित्ररथ (Cultural scenes) दाखवले जाईल.

You may like to read

वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे सांगितले की “हे चित्ररथ लाल किल्ल्यापर्यंत जातील आणि तेथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी उभी राहतील. परंतु मार्चिंग दल नॅशनल स्टेडियमवरच थांबतील. तसेच कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 18, 2022 5:43 PM IST