Top Recommended Stories

Republic Day 2022 : 26 जानेवारीलाच का साजरा होतो प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या इतिहास...

Republic Day 2022: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 26 जानेवारी (26 January)रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day) साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

Updated: January 26, 2022 8:01 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Republic Day 2022 : 26 जानेवारीलाच का साजरा होतो प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या इतिहास...

Republic Day 2022: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 26 जानेवारी (26 January)रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day) साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त काही खास कार्यक्रम होणार आहेत. यात राजधानी दिल्लीच्या राजपथावरील परेड (Republic Day Parade) हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण आहे. असा हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का साजरा होतो? प्रजासत्ताक दिनासाठी हीच तारीख का निवडली गेली? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असेल तर मग जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास (Republic Day History).

Also Read:

याच दिवशी लागू झाले होते संविधान

देशात 26 जानेवारीला सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण (Flag Unfurling) करत उत्साह साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली, मात्र याची अंमलबजावणी 26 जानेवारी रोजी करण्यात आली. त्या दिवसापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

You may like to read

पूर्ण स्वराज्य घोषणेला दिले महत्त्व

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (Indian National Congress) 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण भारताला स्वराज म्हणून घोषित केले. त्यामुळे 20 वर्षांनंतर पूर्ण स्वराज (Purn Swarajya) घोषणेच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात येऊन 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

संविधान निर्मितीत 210 लोकांचे योगदान

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची संविधान निर्मितीत मुख्य भूमिका होती. त्याच्यासह देशाच्या संविधानाच्या निर्मितीत 210 लोकांचा सहभाग होता. संसद भवनाच्या ग्रंथालयातील नायट्रोजन गॅस चेंबरमध्ये हाताने बनवलेल्या कागदावर हाताने लिहिलेली भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत ठेवण्यात आली आहे. जेणेकरून संविधानाची मूळ प्रत जतन करता येईल.

पहिल्या राष्ट्रपतींनी 21 तोफांची सलामी देत केले होते ध्वजारोहण

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण केले आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले. तेव्हापासून देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वजारोहण करतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 25, 2022 8:25 PM IST

Updated Date: January 26, 2022 8:01 AM IST