मुंबई : कोरोना काळामध्ये (Coronavirus) देशभरातील अनेक बँकांनी (Bank) आपल्या ऑफलाइन सेवांना (Offline services) ऑनलाइन (Online Services) केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील वारंवार आवाहन केले जात आहे की, खूपच गरजेचे काम असेल तेव्हाच बँकांमध्ये जा. पण अशामध्ये सुद्धा तुमचे महत्वाचे काम असेल आणि तुम्हाला बँकेमध्ये जायचे असेल तर अशावेळी तुम्हाला बँकाचे कामकाज कोणत्या दिवशी बंद (Bank Holiday) असणार आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. येत्या जुलै महिन्यामध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत…Also Read - Bank Holidays July 2022: जुलैमध्ये 16 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, जुलै महिन्यात 15 दिवस बँक बंद राहणार आहेत. अशामध्ये बँकांच्या या सुट्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याच आधारावर तुम्हाला बँकेमध्ये जाण्याचे प्लॅनिंग करणे सोपे जाईल. जर बँक कोणत्या दिवशी बंद आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. नाही तर बँकेत जाऊनही तुमचे काम होणार नाही. Also Read - RBI Recruitment 2022: आरबीआयमध्ये नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, आत्ताच करा अर्ज

प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर काही सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. जुलै 2021 मध्ये एकूण 15 दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळणार आहेत. सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर या व्यतिरिक्त 6 सुट्ट्या या साप्ताहिक म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या आहेत. Also Read - Explained: UPI प्लॅटफॉर्मशी लिंक होणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या तुम्हाला काय होणार फायदा?

बँकांच्या सुट्ट्याची संपूर्ण यादी –

4 जुलै 2021 – रविवार

10 जुलै 2021 – दुसरा शनिवार

11 जुलै 2021 – रविवार

12 जुलै 2021 – सोमवार – कांग (राजस्थान), रथ यात्रा (भूवनेश्वर, इम्फाळ)

13 जुलै 2021 – मंगळवार – भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, भानू जयंती – सिक्किम)

14 जुलै 2021 – द्रुकपा त्शेची (गंगटोक)

16 जुलै 2021 – गुरुवार – हरेला पूजा (देहरादून)

17 जुलै 2021 – खारची पूज (आगरतळा, शिलाँग)

18 जुलै 2021 – रविवार

19 जुलै 2021 – गुरु रिम्पोछे के थुंगकर त्शेचु (गंगटोक)

20 जुलै 2021 – मंगळवार – ईद अल अधा (देशभर सुट्टी)

21 जुलै 2021 – बुधवार – बकरी ईद (देशभर सुट्टी)

24 जुलै 2021 – चौथा शनिवार

25 जुलै 2021 – रविवार

31 जुलै 2021 – केर पूजा (आगरतळा)