Royal Enfield ची नवीन Scram 411 मोटरसायकल लॉन्चिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Royal Enfield Scram 411 : रॉयल एनफिल्ड कंपनी 2022 मध्ये लॉन्च होणाऱ्या वाहनांची सुरुवात नवीन Scram 411 बाईकसह करण्यास सज्ज आहे. रॉयल एनफिल्ड ही मोटरसायकल याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च करणार होती.

Royal Enfield Scram 411 : रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनी 2022 मध्ये लॉन्च होणाऱ्या वाहनांची सुरुवात नवीन Scram 411 बाईकसह करण्यास सज्ज आहे. रॉयल एनफिल्ड ही मोटरसायकल याआधी फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च करणार होती. मात्र कोरोनाचा (covid-19) वाढता संसर्ग लक्षात घेता कंपनीने लॉन्चिंग पुढे ढकलली आहे. त्यानुसार आता ही बाईक फेब्रुवारी ऐवजी मार्च 2022 मध्ये लॉन्च होईल. या मोटरसायकलचं नाव Scram 411 आहे. मात्र अद्यापही कुठलीही अधिकृत माहिती याबाबत उपलब्ध नाही. या मोटरसायकलला टेस्टिंगदरम्यान नुकतीच दिसली होती. यात ही मोटरसायकल दोन रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये (combination) दिसत आहे.
हिमालयन सारखी असेल बाईक
स्क्रॅम 411 मोटरसायकलची स्टाईल आणि डिझाईन याबाबतची माहिती आधीच इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यानुसार ही बाईक रॉयल एनफिल्डची हिमालयन सारखी आहे. हिमालयन ही पूर्णपणे ऑफ-रोड मोटरसायकल असताना कंपनीने स्क्रम 411 देखील रस्त्यासाठी अनुकूल बनवली आहे आणि ती ऑफ-रोडिंगसाठी देखील वापरली जाऊ शकते.
लाल आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन
अलीकडे, ही नवीन परवडणारी साहसी मोटरसायकल दोन रंगांमध्ये दिसली आहे जी लाल आणि काळ्या रंगाच्या नेत्रदीपक कॉम्बिनेशनमध्ये दिसते. Scram 411 पूर्वी अनेकदा दिसली असली तरी ती ड्युअल टोनमध्ये (Dual Tone) दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाईकच्या पुढील बाजूस 19-इंच चाक आणि मागील बाजूस 17-इंच चाक आहे. या बाईकची किंमत ग्राहकांचा विचार करून ठेवण्यात आली आहे. तिची अंदाजे किंमत सुमारे 1.90 लाख रुपये असेल.
हिमालयच्या तुलनेत आहे स्वस्त
रॉयल एनफिल्ड Himalayan पेक्षा नवीन Scram 411 स्वस्त असेल. हिमालयनच्या पुढील भागाला लांब विंडस्क्रीन (long windscreen), दुभाजक सीट, लगेज रॅक, मोठ्या आकाराचे फ्रंट व्हील आणि अॅडव्हेंचर बाईकचे इतर अनेक पार्ट देले आहेत. याउलट, Scram 411 ला छोटी चाके, सिंगल पीस सीट, लहान सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि मागील बाजूस ग्रॅब रेल देण्यात आली आहे. नवीन मोटरसायकलला LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे जे 411 cc आणि 24.3 bhp पावर बनवते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या