Top Recommended Stories

RRB NTPC Result Student Protest: रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना रेल्वेत नोकरी नाही, रेल्वेचा मोठा निर्णय

RRB NTPC Result Student Protest: आरआरबी एनटीपीसी निकालाबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हजारो उमेदवार RRB NTPC निकालाविरोधात आंदोलन करत होते.

Published: January 26, 2022 2:00 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

RRB NTPC Result Student Protest: रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना रेल्वेत नोकरी नाही, रेल्वेचा मोठा निर्णय
RRB NTPC Result Latest Update

RRB NTPC Result Student Protest: आरआरबी एनटीपीसी निकालाबाबत (RRB NTPC Result) बिहारमधील विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हजारो उमेदवार RRB NTPC निकालाविरोधात आंदोलन (Student Protest) करत होते. या आंदोलनादरम्यान करण्यात आलेली तोडफोड आणि बेकायदेशीर गतिविधींमध्ये सहभागी उमेदवार आणि इतर उच्छूक उमेदवाराच्या रेल्वेतील भरतीवर (Railway recruitment) आजीवन बंदी घालण्यात येईल, असं रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. बिहारमध्ये निदर्शनादरम्यान (Protests in Bihar) पाटण्यासह अनेक ठिकाणी युवक रेल्वे रुळांवर बसल्याच्या घटनेच्या एका दिवसानंतर रेल्वेचे हे वक्तव्य आले आहे. NTPC परीक्षेत सुमारे 1.25 कोटी उमेदवार बसले होते आणि त्या परीक्षेचा निकाल या महिन्याच्या सुरुवातीला आला होता.

Also Read:

रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सध्या NTPC आणि लेव्हल 1 च्या परीक्षेवर बंदी घातली आहे. यासोबतच रेल्वे मंत्रालयाकडून एक समिती गठित करण्यात आली असून ही समिती उत्तीर्ण विद्यार्थी आणि परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुद्दे ऐकून घेणार असून ही समिती आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालय पुढील निर्णय घेईल. सध्या रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या परीक्षेवर बंदी (Ban on railway exams) घातली आहे.

You may like to read

विद्यार्थ्यांच्या रेल्वे रुळावरील आंदोलनानंतर रेल्वेने एक नोटीस जारी करत म्हटले की, “अशा प्रकारच्या दिशाहीन गतिविधीं अनुशासनहीनतेचा कळस आहे. त्यामुळे हे लोक रेल्वेमध्ये भरतीसाठी अपात्र आहेत.” अशा प्रकारच्या गतिविधींचे व्हिडिओ तपासले जातील आणि बेकायदेशीर गितिविधींमध्ये सहभागी उमेदवार किंवा नोकरीसाठी उच्छुक असलेल्या इतर उमेदवारांवर रेल्वे भरतीमध्ये आजीवन बंदी असेल. असे लोक आपल्याविरोधातील पोलिसांच्या कारवाईसाठी स्वतःच जबाबदार असतील”.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC) परीक्षेच्या निकालातील कथित अनियमिततेच्या विरोधात परिक्षांर्थीनी ही निदर्शने केली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. यामुळे पाटणामधील किमान पाच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या, तर राजेंद्र नगर टर्मिनलवर ट्रॅक रुळावरून घसरल्याने अनेक गाड्या वळवाव्या लागल्या. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रेल्वेने कोचिंग सेंटर्सना उमेदवारांमध्ये जागृती करण्याचे आवाहन केले आहे”.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 26, 2022 2:00 PM IST