Top Recommended Stories

2000 Rupee Note: नव्या वर्षात बंद होणार 2000 रुपयांची नोट, 1000 रुपयांच्या नव्या नोटा येणार?

2000 Rupee Currency Notes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार (Union Government) लवकरच 2000 रुपयांच्या नोटा (Rs 2000 Currency) बंद करणार आहे. 1000 रुपयांच्या नव्या नोटा (Rs 1000 New Currency) बाजारात आणणार आहे, अशा चर्चेला सोशल मीडियावर (Social Media) अक्षरशः ऊत आला आहे.

Updated: December 22, 2022 4:47 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

2000 Rupee Note Ban, Rs 2000 Note Will Be Closed, Fact Check, RBI Fact Check, Currency, RBI, PM Narendra Modi, GOVERNMENT Of india, Rs 2000 Currency, Rs 1000 new Currency, 500, 1000 Note Ban, Latest Marathi news, Marathi Batamya, Big News, Breaking news, Trending news Today

2000 Rupee Currency Note: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 8 नोव्हेंबर, 2016 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित केलं होतं. तेव्हा पंतप्रधानांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा (500, 1000 Note Ban) बंद केल्याची मोठी घोषणा केला होती. त्यानंतर बाजारात 2000 रुपयांच्या नव्या नोटा (2000 Rupees Note) आल्या होत्या.आता भारत सरकारकडून 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार आहे. बाजारात 1000 रुपयांच्या नव्या नोटा (1000 Rupees Note) येणार आहे, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या चर्चेमुळे देशातील नागरिक त्रस्त झाला आहे. पण या चर्चेत सत्यता आहे का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

नेमकं काय व्हायरल होतंय…

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ होत आहे. 1 जानेवारी, 2023 पासून 1000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात दाखल होणार आहेत. तर 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार आहे, असे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. सध्या बाजारात असलेल्या 2000 रुपयांना कोणतेही मुल्य नसेल. 2000 रुपयांच्या नोटा जवळ बाळगू नका. त्या बँकेत जमा करा. एक व्यक्तीला केवळ 50 हजार रुपयांच्या 2000 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी असेल, विशेष म्हणजे पैसे जमा करण्याची मुदत केवळ 10 दिवस दिली जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओ मेसेजने देशातील सामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे.

You may like to read

खरंच बंद होणार का 2000 रुपयांच्या नोटा, जाणून घ्या Fact Check..

येत्या 1 जानेवारी, 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार असून बाजारात 1000 रुपयांच्या नव्या नोटा येत असल्याचा सोशल मीडियातून दावा केला जात आहे. नोट बंदीचा व्हिडिओ मेसेज झपाट्याने व्हायरल होत आहे. सर्वत्र चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा देशातील नागरिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर PIB ने फॅक्ट चेक केलं आणि ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ समोर आलं. सोशल मीडियावर केला जात असलेला दावा फेक असल्याचे PIB ने स्पष्ट केलं आहे.

PIBFactCheck नुसार, सोशल मीडियावर व्हायरल असलेला व्हिडिओ मेसेज फेक आहे. त्यावर देशातील नागरिकांनी विश्वास ठेवू नका. कृपया नागरिकांनी अफवेचा मेजेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन PIB ने देशातील नागरिकांना केले आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज सपशेल फेक असल्याचे PIB च्या पडताळणीमध्ये आढळून आले आहे. केंद्र सरकारने (Government of India) 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे देखील PIB ने स्पष्ट केलं आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.