Top Recommended Stories

Rules Change From 1 August 2022: 1 ऑगस्टपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

Rules Change From 1 August 2022: एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price) किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार की कमी होणार हे 1 ऑगस्टला कळेल. तसंच 1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदाचे काही नियम बदलणार आहेत.

Published: July 28, 2022 11:10 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

1 ऑगस्टमध्ये होणार अनेक बदल
1 ऑगस्टमध्ये होणार अनेक बदल

Rules Change From 1 August 2022 : 2022 या वर्षातील सातवा महिना संपत आला आहे. चार दिवसांनंतर ऑगस्ट महिना (August 2022) सुरु होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे नेमके काय बदल होणार हे तुम्हाला सुद्धा माहिती असणे गरजेचे आहेत. एलपीजी सिलिंडरच्या (LPG Price) किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार की कमी होणार हे 1 ऑगस्टला कळेल. तसंच 1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदाचे काही नियम बदलणार आहेत. त्याचसोबत बँकांना देखील ऑगस्ट महिन्यात सुट्ट्या असणार आहेत.

Also Read:

LPG सिलेंडरची किंमत –

एलपीजीच्या किमती (LPG Price) प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 ऑगस्ट 2022 रोजी सिलिंडरच्या किमती वाढतात की कमी होतात हे पाहावे लागेल.

You may like to read

बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट नियम –

बँक ऑफ बडोदाचे (BOB) चेक पेमेंट नियम 1 ऑगस्टपासून बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गाइडलाइन्सचे पालन करत बँक ऑफ बडोदानं चेक पेमेंटचे नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉजिटिव पे सिस्टम (Positive Pay System) लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे बँकेला द्यावी लागणार आहे. ही माहिती दिल्यानंतर चेक क्लिअर होईल. बँकेने एकाधिक धनादेश जारी केल्यास, त्याचा क्रमांक, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह अनेक तपशील बँकेला प्रदान करावे लागतील.

पॉजिटिव पे सिस्टम –

बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये धनादेशांसाठी पॉजिटिव पे सिस्टम सुरू केली होती. या प्रणालीद्वारे चेकद्वारे पेमेंट करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त पेमेंटसाठी काही महत्त्वाची माहिती देणे आवश्यक आहे. या प्रणालीनुसार एसएमएस, बँकेच्या मोबाईल अॅप किंवा एटीएमद्वारे चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला चेकशी संबंधित काही माहिती बँकांना द्यावी लागणार आहे. या माहितीची नंतर चेक भरण्याच्या वेळी तपशीलांसह पडताळणी केली जाईल. सर्व तपशील बरोबर असला तरच धनादेश दिला जाईल.

ऑगस्टमध्ये 18 दिवस बँका बंद –

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays August 2022) जाहीर केली होती. या यादीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये बँका 13 दिवस बंद (Bank Holidays List August 2022) राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात देशाच्या विविध भागात विविध सण साजरे केले जातात. यामध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी या सारख्या सणांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी या साप्ताहिक सुट्ट्या असतील. पुढील महिन्यात 13 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. या कालावधीत ग्राहक एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरू शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.